या घटनेमुळे महामार्गावरील एक लेन बंद झाली आहे. मात्र सर्व्हिस रोड वरून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जेसीबी मागवून टँकरला उचलण्याचं आणि रस्ता मोकळा करण्याचं काम वेगानं सुरु आहे.
मुंबई गोवा महामार्गावर खेड आणि चिपळूण दरम्यान परशुराम घाटामध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. या दरम्यान लोटे एमआयडीसी मधील एका कंपनीमधून रसायन घेऊन जाणारा टँकर महामार्गाच्या दुभाजकाला धडकून पलटी झाला, याच दरम्यान केमिकलच्या टँकरने कंटेनरने व्हॅगनार कार आणि एका दुचाकीला देखील ठोकर दिली आणि महामार्गाच्या एका लेनवर पलटी झाला.
advertisement
या अपघातात कंटेनर चालक आणि दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली व वाहतूक सर्व्हिस रोड ने सुरू करण्यात आली, घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे महामार्ग ठप्प झाला नाही.
