प्रवाशांचा प्रतिसाद पाहता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. खरंतर, कोकणवासीयांसाठी हे भारत सरकारकडून मोठं गिफ्टच म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला भारतीय रेल्वेची सर्वाधिक लोकप्रिय ट्रेन म्हणजे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस. देशातील अनेक मार्गांवर या ट्रेनची सेवा सुरू आहे. प्रवाशांचा या ट्रेनला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणवासीयांकडूनही या ट्रेनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता अशातच कोकणवासीयांना भारतीय रेल्वेकडून गिफ्ट मिळालेलं आहे. गणेशोत्सवापासून 'मुंबई- मडगाव- गोवा' ही वंदे भारत रेल्वे १६ डब्ब्यांची चालवली जाणार आहे.
advertisement
गणेशोत्सवात कोकणवासीयांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने ३८० हून अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडले आहेत. असं असलं तरीही अनेक कोकणवासीयांना अजूनही तिकीट मिळालेले नाहीत. त्यामुळे कोकणकरांना गिफ्ट म्हणून भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसला ८ अतिरिक्त डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोकणात वंदे भारत एक्सप्रेसचे एकूण १६ कोचेस असलेली ट्रेन धावणार आहे. कोकणवासीय सध्या मुंबई- गोवा महामार्गावरून कोकणाची वाट धरताना दिसत आहे. एकीकडे ट्रॅफिक आणि दुसरीकडे खड्डेमय रस्ते यांच्यामुळे कोकणवासीय हैराण असताना कोकणवासीयांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
