TRENDING:

मुंबईत काँग्रेसकडून वंचितला 45 जागा, 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Last Updated:

Mumbai Mahanagar Palika Election: मुंबई महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित आघाडीत काँग्रेसने वंचितला एकूण ४५ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महानगर पालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (२ जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तिकीट न मिळाल्याने राज्यभरात अनेक बंडखोरांनी पक्षाच्या विरोधात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या दिवशी नेत्यांकडून मनधरणी केल्यानंतर बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पण काही ठिकाणी उमेदवारांनी बंडखोरी कायम ठेवत, निवडणूक लढण्याचा निर्णय अंतिम केला. यानंतर आता राज्यभरात कोणत्या महानगर पालिका निवडणुकीत कोण कुणाविरोधात लढत आहे, याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
News18
News18
advertisement

महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुंबईत कशी निवडणूक असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता इथलं चित्र देखील स्पष्ट झालं आहे. तिथं बहुतांशी प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर काही ठिकाणी चौरंगी निवडणुकीची अपेक्षा आहे. इथं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना बघायला मिळेल, अशी अपेक्षा असताना महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडल्याचं बघायला मिळालं.

advertisement

इथं भाजप-शिवसेना, ठाकरे बंधू, आणि काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी अशा तीन युती झाल्या आहेत. मुंबईत अजित पवार गटाकडूनही उमेदवार मैदानात उतरवले आहेत. काँग्रेस वंचित आघाडीत काँग्रेसने वंचितला एकूण ४५ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.

मुंबई महानगर पालिका वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण यादी

क्रमांक वार्ड क्रमांक उमेदवाराचे नाव
1 24 सरोज दिलिप मगर
2 27 संगिता दत्तात्रय शिंगाडे
3 38 तेजस्विनी उपासक गायकवाड
4 42 रेवाळे मनिषा सुरेश
5 53 नितीन विठ्ठल वळवी
6 54 राहुल ठोके
7 56 ऊषा शाम तिरपुडे
8 67 पिर महमंद मुस्ताक शेख
9 68 पलमजित सिंह गुंबंर
10 73 स्नेहा मनोज जाधव
11 76 डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
12 85 अय्यनार रामस्वामी यादव
13 88 निधी संदीप मोरे
14 95 विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
15 98 सुदर्शन पिठाजी येलवे
16 107 वैशाली संजय सकपाळ
17 108 अश्विनी श्रीकांत पोचे
18 111 अँड रितेश केणी
19 113 सुर्यकांत शंकर आमणे
20 114 सिमा निनाद इंगळे
21 118 सुनिता अंकुश वीर
22 119 चेतन चंद्रकांत अहिरे
23 121 दिक्षिता दिनेश विघ्ने
24 122 विशाल विठ्ठल खंडागळे
25 123 यादव राम गोविंद बलधर
26 124 रीता सुहास भोसले
27 127 वर्षा कैलास थोरात
28 139 स्नेहल सोहनी
29 146 सतिश वामन राजगुरू
30 155 पवार ज्योती परशुराम
31 157 सोनाली शंकर बनसोडे
32 160 गौतम भिमराव हराळ
33 164 आशिष प्रभु जाधव
34 169 स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
35 173 सुगंधा राजेश सोंडे
36 177 कुमुद विकास वरेकर
37 193 भुषण चंद्रशेखर नागवेकर
38 194 शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
39 195 पवार ओमकार मोहन
40 196 रचना अविनाश खुटे
41 197 डोळस अस्मिता शांताराम
42 199 नंदिनी गौतम जाधव
43 202 प्रमोद नाना जाधव
44 207 चंद्रशेखर अशोक कानडे
45 225 विशाल राहुल जोंजाळ

advertisement

काँग्रेस वंचितमधील मैत्रीपूर्ण लढत असलेले वॉर्ड आणि उमेदवार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सावित्री-ज्योतिबांच्या कर्तृत्वाचा जागर, पुण्यात जमला 800 कवींचा मेळा, Video
सर्व पहा

अ.क्र. वॉर्ड क्रमांक उमेदवाराचे नाव
46 वॉर्ड 116 राजकन्या विश्वास सरदार
47 वॉर्ड 125 सुमित कासारे
48 वॉर्ड 133 सुप्रीया मनोज जाधव
49 वॉर्ड 140 सोहन दादु सदामस्त
50 वॉर्ड 181 अजिंक्य पगारे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत काँग्रेसकडून वंचितला 45 जागा, 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल