मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या लालजी पाडा पोलीस चौकीच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत यादव आणि चौहान असे दोन गट आमने सामने आले होते.यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी मारहाण केली होती.तसेच या घटनेदरम्यान दगडफेक झाल्याचेही समोर आले आहे.दोन गटात दंगल कशी पटते,असे दृष्य यावेळी निर्माण झाले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, दुकान रिकामे करण्याच्या वादातून 4 सप्टेंबरला ही घटना घडल्याची माहिती आहे. दुकान रिकामं करत नसल्याने यादव आणि चौहान गटात तुफान हाणामारी झाली होती. दोन्ही गट आमने सामने आले होते आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती. या दरम्यान दगडफेकही झाली होती. त्यामुळे दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. राम लखन यादव असे या 65 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत 7 ते 8 लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी आधी क्रॉस केस नोंदवली होती. पण वृद्ध व्यक्तीच्या हत्येनंतर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यासह संजय चौहान, अमरनाथ चौहान, अवधेश चौहान आणि कमलेश चौहान अशा चार जणांना अटक केली आहे. तर इतर 15 ते 16 आरोपी फरार आहेत.कांदिवली पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.