TRENDING:

'...त्यानंतर कारवाई करू', पार्थ पवारांच्या क्लीन चीटवर भाजपच्या मंत्र्याचं मोठं विधान

Last Updated:

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी पोलिसांनी मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरोधात तब्बल १८८६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे. विशेष बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातून एकप्रकारे त्यांना क्लीन चीट दिल्याची चर्चा सुरू आहे.
News18
News18
advertisement

आता या प्रकरणावर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली नाही. क्लीन चिट दिल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. याबाबतचा अहवाल पुढील आठवड्यात अहवाल येईल. त्यानंतर आम्ही कारवाई करू, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

पार्थ पवारांना मिळालेल्या कथित क्लीन चीट बाबत विचारलं असता बावनकुळे म्हणाले, " याबाबतचा कुठलाही अहवाल अजूनही सरकारकडे आलेला नाही. अहवाल सरकारकडे नाही. खारगे समितीला 8 दिवसाची मुदत वाढ दिली आहे. 8 दिवसाच्या आत मध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येईल."

advertisement

मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक मोठी नावे चर्चेत होती. तपासादरम्यान पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावरही संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपासानंतर दाखल केलेल्या दोषारोपपत्रात या दोघांविरोधात कोणतेही आरोप सिद्ध न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, या प्रकरणात शीतल तेजवाणी हिच्यावरच सर्व आरोप ठेवण्यात आले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

चार्जशीटनुसार, जमीन व्यवहारात नियमबाह्य कागदपत्रे, आर्थिक फसवणूक आणि गैरमार्गाने लाभ मिळवण्याचे आरोप शीतल तेजवाणीवर करण्यात आले आहेत. तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तिच्याविरोधात विस्तृत स्वरूपात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'...त्यानंतर कारवाई करू', पार्थ पवारांच्या क्लीन चीटवर भाजपच्या मंत्र्याचं मोठं विधान
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल