TRENDING:

शिलेदार लढाईआधीच पसार, सत्ताधाऱ्यांची बिनविरोध खेळी; विरोधकांना मतदानापूर्वीचं कसं केलं घायाळ?

Last Updated:

बिनविरोध उमेदवार निवडीत शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या  कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  महानगर पालिका निवडणुकीच्या रणांगणातून अनेकांनी पळ काढला असून त्यात बहुसंख्य हे विरोधी पक्षातले उमेदवार आहेत. जी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कल्याण डोंबिवलीला आपला बालेकिल्ला म्हणायची. त्या किल्ल्यातले त्यांचे अनेक शिलेदार लढाईआधीच पसार झालेत. त्यामुळे विरोधकांची मोठी अडचण झालीय.
News18
News18
advertisement

महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा एल्गार केला होता.

त्यामुळे पालिका निवडणुकीत एकाएका जागेसाठी मोठी चूरस होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

पण उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चित्र काही वेगळचं पाहायला मिळालं. मतदानापूर्वी सत्ताधारी महायुतीनं मास्टर स्ट्रोक मारला आहे.भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एक दोन नव्हे तर तब्बल 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना दे धक्का दिलाय. बिनविरोध उमेदवार निवडीत शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या  कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत

advertisement

कसं आणि कुणाच्या माघारीमुळे कुणाला फायदा झाला ?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 उमेदवारांनी माघार घेतली त्याचा थेट फायदा भाजपला झाला. भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर मनसेच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपाच्या 4 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. इकडं काँग्रेसच्या चौघांनी निवडणुकीतून माघार घेतली.ती भाजपाच्या पथ्यावर पडली. काँग्रेस उमेदवारांच्या माघारीमुळे भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध झाले.

advertisement

बिनविरोध खेळीमुळे विरोधक मतदानापूर्वीचं घायाळ

माघारीच्या शर्यतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मागे राहिले नाहीत.एका उमेदवारानं माघार घेतल्यानं शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध झाला. तर, मनसेच्या 3 उमेदवारांच्या माघारीनं शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध झाले. मनसे प्रमाणेच शिवसेना उबाठाच्या 3 उमेदवाराच्या माघारीनं शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध झाले.ठाण्यातही शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध झाले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या बिनविरोध खेळीमुळे विरोधक मतदानापूर्वीचं घायाळ झाले आहेत.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

बिनविरोध नगरसेवकांची झोप उडणार, निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशाने धडधड वाढली

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिलेदार लढाईआधीच पसार, सत्ताधाऱ्यांची बिनविरोध खेळी; विरोधकांना मतदानापूर्वीचं कसं केलं घायाळ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल