Maharashtra Election: बिनविरोध नगरसेवकांची झोप उडणार, निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशाने धडधड वाढली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निवडणूक आयोगाने देखील याची दखल घेतली निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांचा सर्वात जास्त टक्का आहे. अनेक ठिकाणी विरोधी पक्षातील उमेदवारी अर्ज मागे घेतले तरी काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यामुळं उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलं असून विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाने देखील याची दखल घेतली निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
बिनविरोधी निवडीच्या या प्रकाराची राज्य निवडणूक आयोगानंही गंभीर दखल घेतली आहे. राज्य निवडणूक आयोग बिनविरोध उमेदवारांच्या प्रकाराची चौकशी करणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं याबाबतचा अहवाल मागवला आहे.पालिका आयुक्त याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला देणार आहे. यामुळं बिनविरोध उमेदवारांच्या जीवाला घोर लागलाय पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडीमुळे वातावरण ढवळून निघाली आहे.
advertisement
काय आहे निवडणूक आयोगाचा आदेश?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी ब-याचदा नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या तारखेनंतर एकच उमेदवार शिल्लक गहिल्याने उमेदवारें बिनविरोध निवडून आला असे जाहीर करण्यात येते. उमेदवार अर्ज भरताना अनेक उमेदवार अर्ज भरतात परंतु नामनिर्देशनपत्रमागे घेण्याच्यावेळी एक उमेदवार सोडून अन्य सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतात. अशा वेळी तो उमेदवार इंतर उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावतो, ही शक्यता नाकारता येत नाही. तरी यापुढे असे प्रसंग घडल्यास राज्य निवडणूक आयोगाला त्याबातया
advertisement
सविस्तर अहवाल तात्काळ पार्ठविण्यात यावा व राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच
त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात यावे.
कुठे कुठे निवडून आले उमेदवार?
कल्याण डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यात भाजपच्या 15 तर
शिवसेनेच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे.जळगावमध्ये 12 जण बिनविरोध झालेत, त्यात भाजप आणि शिवसेनेचे
प्रत्येकी 6 -6 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत. भिवंडीत भाजपचे सहा तर शिवसेनेचे दोन असे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झालेत.तर ठाण्यात शिवसनेचे सात ,पनवेलमध्ये भाजपचे सहा तर अपक्ष एक असे सात उमेदवार बिनविरोध झालेत.अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन असे पाच उमेदवार विजयी झाले.धुळ्यात भाजपचे भाजपचे चार उमेदवार विजयी झालेत. तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये
advertisement
भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 9:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election: बिनविरोध नगरसेवकांची झोप उडणार, निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशाने धडधड वाढली









