राज्यभरात महानगरपालिकांचा धुरळा; मुंबईतून 1700 तर पुण्यातून 1166 उमेदवार रिंगणात, 29 पालिकांची अंतिम आकडेवारी समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर राज्यभरातून 15,931 उमेदवार मैदानात आहेत.
मुंबई : मतदानाला अजून १२ दिवस शिल्लक आहेत. प्रचाराच्या तोफा अजून थंडच आहे. त्यातच काहीजणांच्या डोक्यावर गुलाल पडलाय. याला काहीजण विरोधकांची हाराकिरी म्हणताहेत तर विरोधक याला सत्ताधाऱ्यांची खेळी म्हणत आहेत. त्यामुळे बिनविरोधवरून विरोध सुरु झाला आहे. काल अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर आज निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून एकट्या मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर राज्यभरातून 15,931 उमेदवार मैदानात आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अर्ज माघारीमुळे काही प्रभागांतील उमेदवारांची संख्या कमी होऊन निवडणूक लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने आता अंतिम निवडणूक लढवणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. सर्वाधिक म्हणजे 1700 उमेदवार मुंबईतून त्यानंतर पुण्यातून 1166 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.
कुठून किती जागांसाठी किती उमेदवार?
advertisement
- मुंबई : मुंबईत 227 जागांसाठी तब्बल 1700 उमेदवार
- छत्रपती संभाजीनगर - 115 जागांसाठी तब्बल 859 उमेदवार
- नवी मुंबई - 111 जागांसाठी तब्बल 499 उमेदवार
- वसई-विरार - 115 जागांसाठी तब्बल 547 उमेदवार
- कोल्हापूर - 81 जागांसाठी तब्बल 327 उमेदवार
- कल्याण डोंबिवली - 122 जागांसाठी तब्बल 489 उमेदवार
- ठाणे -131 जागांसाठी तब्बल उमेदवार 656
- उल्हासनगर - 78 जागांसाठी तब्बल उमेदवा
- नाशिक - 122 जागांसाठी तब्बल उमेदवार 735
- पुणे - 165 जागांसाठी तब्बल उमेदवार 1166
- पिंपरी-चिंचवड - 128जागांसाठी तब्बल उमेदवार 692
- सोलापूर - 102 जागांसाठी तब्बल उमेदवार 564
- अकोला - 80 जागांसाठी तब्बल उमेदवार 469
- अमरावती - 87 जागांसाठी तब्बल उमेदवार 661
- नागपूर - 151 जागांसाठी तब्बल उमेदवार 993
- चंद्रपूर - 66 जागांसाठी तब्बल उमेदवार 451
- लातूर - 18 जागांसाठी तब्बल उमेदवार 359
- परभणी - 65 जागांसाठी तब्बल उमेदवार 411
- भिवंडी- निजामपूर - 90 जागांसाठी तब्बल उमेदवार 439
- मालेगाव - 84 जागांसाठी तब्बल उमेदवार 301
- पनवेल - 78 जागांसाठी तब्बल उमेदवार 255
- मिरा- भाईंदर - 95 जागांसाठी तब्बल उमेदवार 435
- नांदेड - वाघाळा - 81 जागांसाठी तब्बल उमेदवार 491
- सांगली - मिरज - कुपवाड - 78 जागांसाठी तब्बल उमेदवार 381
- जळगाव- 75 जागांसाठी तब्बल उमेदवार 333
- धुळे- 74 जागांसाठी तब्बल उमेदवार 320
- अहिल्यानगर- 68 जागांसाठी तब्बल उमेदवार 283
- इचलकरंजी - 65 जागांसाठी तब्बल उमेदवार 230
- जालना - 65 जागांसाठी तब्बल उमेदवार 453
advertisement
राज्यातील २९ महानगरपालिकेच्या २८६९ जागांसाठी १५९३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 03, 2026 8:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यभरात महानगरपालिकांचा धुरळा; मुंबईतून 1700 तर पुण्यातून 1166 उमेदवार रिंगणात, 29 पालिकांची अंतिम आकडेवारी समोर









