माजीवाडा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पाडला. यावेळी स्थानिक आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या हालचालींना आता वेग आला असून, ठाणे महापालिका निवडणुकांबाबत मोठी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकांसाठी हालचाली केल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका पुढील टप्प्यात पार पडणार आहेत. राज्य निवडणूक आयोगात या पुढील निवडणुकांसाठी घडामोडींना वेग आला आहे.
advertisement
निवडणूक कधीपर्यंत होणार?
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, शक्य झाल्यास १५ ते २० डिसेंबर या दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू शकते. तर, १५ ते २० जानेवारी दरम्यान महापालिकांसाठी निवडणुका पार पाडतील असा अंदाज सरनाईकांनी व्यक्त केला.
सरनाईक यांनी पुढे सांगितले की,“आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुका तोंडावर आल्यावर विकास करत नाही. ३६५ दिवस आम्ही मैदानात असतो. सर्वसामान्य जनतेपर्यंत २४ तास पोहोचण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे अनुयायी करत आहेत. निवडणुकी आज किंवा उद्या लागल्या किंवा आज लागल्या आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसैनिक 365 दिवस निवडणुकीला सामोरे जायला सज्ज असतो असेही सरनाईकांनी म्हटले.
आधी आनंद दिघेंचा अन् आता एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला...
प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा ऐतिहासिक बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या वारशाचा उल्लेख करत शिंदे गटाने पुन्हा एकदा दावा केला की, “हा बालेकिल्ला आनंद दिघेंचा होता, आता एकनाथ शिंदेंचा आहे. कोणीही कितीही उड्या मारल्या तरी ठाण्यातील समीकरणे बदलणार नाहीत, असे सरनाईकांनी म्हटले. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
