TRENDING:

BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर

Last Updated:

Maharashtra Municipal Election Update: काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी अनपेक्षित नवी समीकरणं आकाराला येत आहेत.

advertisement
मुंबई: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच राजकीय हालचालींना वेग आला असून, जागावाटपाच्या चर्चांमुळे अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. काही महापालिकांमध्ये जुनी राजकीय समीकरणं विस्कटताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी अनपेक्षित नवी समीकरणं आकाराला येत आहेत.
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर....
कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर....
advertisement

अर्ज दाखल झाल्यानंतरही अनेक महापालिकांमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. युतीच्या चर्चांमध्ये ठरलेल्या जागांपेक्षा अधिक उमेदवार काही पक्षांनी प्रत्यक्ष मैदानात उतरवल्याने संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता असून, अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत.

विशेष म्हणजे काही ठिकाणी बंडखोरीची चिन्हंही दिसून येत असून, अधिकृत उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

आता अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत राजकीय हालचालींना वेग येणार असून, नेमकी कोणती युती टिकते आणि कुठे फूट पडते, याचं स्पष्ट चित्र त्यानंतरच समोर येणार आहे.

> राज्यातील महापालिका निवडणुकीत युती-आघाडीचं चित्र काय?

अ.क्र. शहर/क्षेत्र युती (महायुती) आघाडी (मविआ)
1 मुंबई भाजप-शिवसेना ठाकरे बंधू- काँग्रेस स्वतंत्र
2 पुणे भाजप स्वबळावर अजित-शरद पवार, मविआ
3 नागपूर भाजप-शिवसेना काँग्रेस स्वबळावर
4 ठाणे भाजप-शिवसेना ठाकरे बंधूंसह काँग्रेस
5 नाशिक भाजप स्वबळावर मविआ
6 कल्याण भाजप-शिवसेना एकत्र मविआ एकत्र
7 नवी मुंबई भाजप, शिवसेना स्वबळ मविआ एकत्र
8 संभाजीनगर भाजप, शिवसेना स्वबळ मविआ एकत्र
9 सोलापूर भाजप स्वबळावर मविआ, शिवसेना-अजित गट
10 पिंपरी भाजप स्वबळावर मविआ, शिवसेना-अजित गट
11 कोल्हापूर महायुती मविआ एकत्र
12 अमरावती भाजप स्वबळावर मविआ एकत्र
13 अकोला भाजप स्वबळावर मविआ एकत्र
14 उल्हासनगर भाजप-शिवसेना मविआ एकत्र
15 भिवंडी भाजप-शिवसेना मविआ एकत्र
16 मीरा-भाईंदर भाजप स्वबळावर ठाकरे, काँग्रेस एकत्र
17 जळगाव महायुती मविआ एकत्र
18 अहिल्यानगर भाजप, अजित गट एकत्र मविआ एकत्र
19 सांगली भाजप स्वबळावर काँग्रेस स्वतंत्र
20 मालेगाव भाजप स्वबळावर काँग्रेस स्वतंत्र
21 धुळे भाजप स्वबळावर मविआ एकत्र
22 नांदेड भाजप स्वबळावर मविआ एकत्र
23 वसई-विरार महायुती मविआ एकत्र
24 लातूर भाजप स्वबळावर मविआ एकत्र
25 परभणी भाजप स्वबळावर मविआ एकत्र
26 चंद्रपूर महायुती मविआ एकत्र
27 पनवेल महायुती मविआ एकत्र
28 इचलकरंजी महायुती मविआ एकत्र
29 जालना भाजप स्वबळावर मविआ एकत्र

advertisement

इतर संबंधित बातमी:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बाजरीची भाकरी नेहमीच खाता; थंडीत नक्की ट्राय करा हा पौष्टिक पदार्थ, सोपी रेसिपी
सर्व पहा

कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, बीएमसी निवडणुकीत ४३ जागांवर घराणेशाही, पाहा यादी

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: कुठं जुळलं, कुठं बिनसलं? राज्यातील महापालिकांमधील युती-आघाडीचं चित्र एका क्लिकवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल