मतदान यंत्रातील कथित घोळ आणि मतदारयाद्यांवर आक्षेप नोंदवत गेली काही महिने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीने तीव्र लढा छेडला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सत्याचा मोर्चाचे नियोजन सुरू होते. शनिवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने आजच्या मोर्चाला महत्त्व प्राप्त झाले होते.
बिअर्डवाले अमित ठाकरे जेव्हा क्लिन शेव्ह करून मोर्चाला हजेरी लावतात...!
advertisement
सत्याच्या मोर्चात अमित ठाकरे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अमित ठाकरे म्हणजे वाढलेले केस आणि दाढी, जिन्स, पायातले स्पोर्ट्स शूज यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त अतिशय वजनदार वाटायचे... आज मात्र अमित ठाकरे अनेकांना ओळखूनही आले नाही. कारण मोर्चाला येताना त्यांचा लूक बदललेला दिसला. क्लिन शेव्ह करून त्यांनी मोर्चाला हजेरी लावली. अमित ठाकरेंची तुकतुकीत कांती सभास्थळी चर्चेचा विषय ठरली. त्यांच्या बदललेल्या लूकबद्दल मोर्चातील तरुण नेत्यांनीही त्यांच्याकडे विचारणा केली.
https://images.news18.com/news18marathi/uploads/2025/11/Amit-Thackeray-new-look_1324488-2025-11-060a5075632531be5ddf7d0ee6849637.mp4
ठाकरे भावाभावाचे फोटोसेशन
अमित ठाकरे यांचा बदललेला लूक चर्चेचा विषय ठरत असताना आदित्य ठाकरे यांनाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. मंचावर बसलेले असताना आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटोसाठी पोज दिली. दोन भावांच्या फोटोत तिसरे बंधू वरुण सरदेसाई देखील सहभागी झाले.
