बीडमधली परळी नगरपरिषद निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. अशातच आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला. परळीत महायुतीचे दोन उमेदवार विजयी झाले आहे, नगरसेवकपदाचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. बीडच्या परळीनगर परिषदेत महायुतीच्या बाजून पहिलाच निकाल हाती आला आहे. नगरसेवक पदाचे शिंदे गटाचा एक उमेदवार आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार बिनविरोध निघाला आहे. त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीच्या दोन नगरसेवकाला गुलाल लागला आहे.
advertisement
नगरपरिषद निवडणुकीतील जिल्ह्यातील महायुतीच्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराचा हा पहिलाच विजय निकाल आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक 13 मधील रेश्मा बळवंत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 11 मधील जयश्री गीते या शिंदे शिवसेना गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार बिनविरोध जाहीर झाले आहेत.
"काही वळवळ केली तर एकेकाला झोडपून काढीन" भाजप उमेदवाराची धमकी
दरम्यान, बीडच्या नगरपंचायत निवडणुकीत दादागिरी आणि गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीतील गरीब मायक्रो ओबीसी मतदारांना जाहिरपणे दमदाटी करुन झोडपून काढण्याची भाषा भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांच्याकडून केली जात आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाईची मागणी केली आहे.
गेवराई नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांनी प्रचार फेरीदरम्यान दाभाडे गल्ली येथील मायक्रो ओबीसी कुटुंबातील गरीब मतदाराला जाहिररित्या धमकावल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.. "काही वळवळ केली तर माझ्या इतके वाईट नाही, एकेकाला झोडपून काढीन, घरकुलाचे दोन्ही हप्ते टाकलेत, बिलकुल विसरायचे नाही, रिकामी वळवळ करायची नाही" अशी धमकीच गीता पवार यांनी धमकी दिली असल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. तो व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
