TRENDING:

Nagar Parishad Election 2025: राणेंच्या होमग्राऊंडमध्ये महायुतीत 'दशा'वतार', शिवसेनेकडूनच ओपन चॅलेंज!

Last Updated:

एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुतीमध्ये बिघाडी झाली असून शिंदे सेना आणि भाजप ही स्वबळावर निवडणुका लढणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भरत केसरकर, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सिंधुदुर्ग : नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी अंतिम अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे राज्यभरात मिनी विधानसभेचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. ठिकठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री नितेश यांच्या होमग्राऊंडमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळालंय.  एकीकडे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढत असून आपली ताकद आजमावणार आहेत.

advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायतसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा आजचा अंतिम दिवस होता.  पालकमंत्री नितेश राणे यांचे होमपीच असलेल्या कणकवली नगरपंचायतीसाठी महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. कणकवली शहर विकास आघाडीला शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिल्याने कणकवली नगरपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची होईल. इथं भाजपकडून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि शहर विकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यात काटे की टक्कर होईल.

advertisement

निलेश राणे आणि वैभव नाईक यांची प्रतिष्ठापणाला

तर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मालवण नगरपरिषदेवर ठाकरे सेना, भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात कडवी स्पर्धा दिसून येईल. मालवण नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून शिल्पा खोत, शिंदे शिवसेनेकडून ममता वराडकर तर ठाकरे शिवसेनेकडून पूजा करलकर अशी तिरंगी लढाई दिसून येईल. एकंदरीत मालवण नगरपरिषदेसाठी विद्यमान आमदार निलेश राणे आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठापणाला लागल्याचे दिसून येत आहे.

advertisement

याशिवाय वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. वेंगुर्लामध्ये काँग्रेसचे विलास गावडे यांच्याविरुद्ध भाजपचे दिलीप उर्फ राजन गिरप तर शिंदे शिवसेनेचे नागेश उर्फ पिंट्या गावडे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संदेश निकम यांच्या चौरंगी लढत होणार आहे.

दीपक केसरकरांच्या बालेकिल्ल्यात पंचरंगी लढत

तर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये सुद्धा सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धाराजे भोसले, शिंदे शिवसेनेच्या सौ.नीता कविटकर- सावंत तर काँग्रेसच्या साक्षी वंजारी आणि ठाकरे शिवसेनेची सीमा मठकर अशी चौरंगी लढत होईल. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अन्नपूर्णा कोरगावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी बंडखोरी केल्यास सावंतवाडीत पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका एकरात केली काकडी लागवड, 60 दिवसांत 1 लाख कमाई,शेतकऱ्याने सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुतीमध्ये बिघाडी झाली असून शिंदे सेना आणि भाजप ही स्वबळावर निवडणुका लढणार आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election 2025: राणेंच्या होमग्राऊंडमध्ये महायुतीत 'दशा'वतार', शिवसेनेकडूनच ओपन चॅलेंज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल