सातारा: नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात एकीकडे महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. तर दुसरीकडे नगर परिषदेच्या निवडणुकीतही महायुतीमध्ये काही ठिकाणी एकत्र तर कुठे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली जात आहे. अशातच साताऱ्यात नगर परिषद निवडणुकीत भाजपने विजयाचं खातं उघडलं आहे. या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का दिला आहे.
advertisement
साताऱ्यात भारतीय जनता पक्षाने नगरपरिषदेत विजयाचं खातं उघडलं आहे. मलकापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. अर्ज छाननीत मलकापूर नगर परिषदेत भाजपाचे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. आमदार अतुल भोसले यांचा करिष्मा इथं पाहण्यास मिळाला आहे. आमदार अतुल भोसले नेतृत्वाखाली नगर परिषद निवडणूक लढवली जात आहे. आता मलकापूर नगर परिषदेत एकाच वेळी ५ उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहे.
या प्रभागात उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 4 मधून सुनिल खैरे विजयी
प्रभाग क्रमांक 7 मधून - हणमंतराव जाधव, सुनीता पोळ विजयी
प्रभाग क्रमांक 9 मधून -जोत्सना शिंदे आणि दिपाली पवार
दरम्याान, भाजपाने साताऱ्यात नगरपालिका निवडणुकीसाठी भक्कम तयारी केली होती. कराडला शिवसेना आणि भाजपाचा उमेदवार स्वतंत्र लढत आहे. तर राष्ट्रवादीने मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेतल्यानं अतुल भोसलेंनी अजितदादांच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर सूत्र फिरली आणि आज मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत पहिले ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. साताऱ्यात काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने असणार असल्याचं जिल्हाध्यक्ष भाजप आमदार अतुल भोसले यांनी आधीच जाहीर केलं होतं.
