TRENDING:

Nagpur: नागपूर हादरलं! राऊळगावमधील कंपनीत डिटोनेटरचा भीषण स्फोट, १५ कामगार जखमी, सकाळी ७ वाजता नेमकं काय घडलं?

Last Updated:

Nagpur Blast : राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर (काटोल): नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १५ हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.
नागपूर हादरलं! कंपनीत डिटोनेटरचा भीषण स्फोट, १५ कामगार जखमी, सकाळी ७ वाजता नेमकं काय घडलं?
नागपूर हादरलं! कंपनीत डिटोनेटरचा भीषण स्फोट, १५ कामगार जखमी, सकाळी ७ वाजता नेमकं काय घडलं?
advertisement

सकाळी ७ वाजताच्या घटनेने खळबळ...

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आज सकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास घडली. राऊळगाव येथील एसबीएल कंपनीत खाणींमधील खोदकामासाठी लागणारे डिटोनेटर आणि इतर स्फोटके तयार केली जातात. सकाळी कामगार कामावर रुजू झाले असताना, डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेत अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला.

advertisement

२५ ते ३० कामगार आत अडकल्याची भीती

स्फोटाच्या वेळी कंपनीच्या त्या युनिटमध्ये सुमारे २५ ते ३० कामगार कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर कंपनीत मोठी आग लागली असून संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आतापर्यंत १५ जखमींना बाहेर काढून नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

advertisement

बचावकार्य युद्धपातळीवर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: नागपूर हादरलं! राऊळगावमधील कंपनीत डिटोनेटरचा भीषण स्फोट, १५ कामगार जखमी, सकाळी ७ वाजता नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल