TRENDING:

Nagpur News : बड्या बापाच्या पोराचा धक्कादायक प्रताप, भरधाव मारूती कारने महिलेला उडवलं, नागपूरमधील धक्कादायक घटना

Last Updated:

नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका मारूती कारने एका महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. प्रताप नगर परिसरात सायंकाळी ही अपघाताची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या गाडीचा चालक एक अल्पवयीन मुलगा होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका मारूती कारने एका महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. प्रताप नगर परिसरात सायंकाळी ही अपघाताची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या गाडीचा चालक एक अल्पवयीन मुलगा होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सूरू केला आहे. तसेच पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.तसेच वाहन चालकाची व पालकांची जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेचा पुढील तपास प्रतापनगर पोलिसांकडून सुरू आहे.
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगा भरधाव मारूती कार घेऊन निघाला होता.या दरम्यान वाटेतच एक महिला रस्ता ओलांडत होती. मात्र मारूती कार चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटल्याने त्याने महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. राधे मंगलम हॉल समोरून स्वरूप नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

या घटनेनंतर अपघातग्रस्त महिलेला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच महिलेची प्रकृती कशी आहे?याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे. या अपघाताची माहिती मिळताच प्रताप नगर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल होते. यावेळी प्राथमिक तपासात कार अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.तसेच वाहन चालकाची व पालकांची जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेचा पुढील तपास प्रतापनगर पोलिसांकडून सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur News : बड्या बापाच्या पोराचा धक्कादायक प्रताप, भरधाव मारूती कारने महिलेला उडवलं, नागपूरमधील धक्कादायक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल