चादरीत गुंडाळलं अन् अंधाऱ्या खोलीत फेकून दिलं
सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेले दृश्य काळजाचा थरकाप उडवणारे आहे. पार्टी करताना मित्र बेशुद्ध पडला पण तब्बल 11 मित्रांनी त्याची थोडी सुद्धा मदत केली नाही. मित्राला जास्त झाली असावी, असं अंदाज बांधून त्याला एका खोलीमध्ये टाकून दिलं. मदतीसाठी हात पुढे करण्याऐवजी, या मित्रांनी बेशुद्ध आदित्यला एका चादरीत गुंडाळलं आणि एखाद्या जनावरासारखे फरफटत नेऊन एका अंधाऱ्या खोलीत फेकून दिले.
advertisement
बॅचलर पार्टीचं आयोजन
आदित्यचा स्टील आणि लोखंडाचा व्यवसाय होता आणि त्याला पार्ट्यांची फारशी आवड नव्हती. आदित्यने मित्रांनी आग्रह केल्याने पार्टीला गेला. पण ही पार्टी त्याच्यासाठी अखेरची ठरली. सदर घटना 16 नोव्हेंबर 2024 रोजी नागपूर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर घडली. जोएल सिंग नावाच्या मित्राच्या लग्नानिमित्त बॅचलर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व मित्र एकत्र जमले होते, खाण्यापिण्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र, याच दरम्यान आदित्य मोहिते हा तरुण अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला.
मित्रांचा बेजबाबदारपणा समोर
आदित्य जमिनीवर निपचित पडलेला असताना मित्रांनी मात्र पार्टी बंद केली नाही. मित्रांनी त्याला चादरीत गुंडाळलं अन् एका खोलीत टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आदित्यचे मोठे भाऊ ॲडव्होकेट परीक्षित मोहिते यांनी फोन केला की आदित्य उठत नाहीये, तेव्हा त्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात नेण्यास सांगितलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केलं. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या मित्रांचा बेजबाबदारपणा समोर आलाय.
