TRENDING:

वय फक्त आकडा, 63 वर्षांचे आजोबा 175 किलो वजन सहज करतात लिफ्ट

Last Updated:

63 वर्षीय आजोबा या वयात देखील पावर लिफ्टिंग हा खेळ खेळून भल्या भल्याना थक्क करणारे धाडस करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर, 4 ऑगस्ट : जिममध्ये जाऊन शरीर कमावणे, तंदुरुस्त राहणं इत्यादींची क्रेझ तरुणाईत असलेली आपण कायम बघत असतो. मात्र हिच क्रेझ जपली आहे नागपुरातील 63 वर्षीय सुभाष कामडी यांनी. आता प्रश्न पडला असेल की त्यात विशेष बाब काय? तर त्याचे उत्तर आहे. सुभाष कामडी हे या वयात देखील पावर लिफ्टिंग हा खेळ खेळून भल्या भल्याना थक्क करणारे धाडस करतात. विशेष बाब म्हणजे या खेळात ते थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 175 किलो वजनाचे डेड लिफ्ट, 140 किलोचा स्कॉट आणि 75 किलोची बेंच प्रेस लीलया पेलतात. पोलिस विभागातून निवृत्त झाल्यामुळे आता सुभाष हे तरुणाईला या क्षेत्रात पूर्णवेळ प्रशिक्षणाचे धडे देत आहेत.
advertisement

कशी झाली सुरुवात? 

2018 साली मी माझ्या पोलिसी पेशातून निवृत्त झालो. मला लहानपणा पासूनच अनेक खेळामध्ये रुची राहिली आहे. त्यात शालेय जीवनात मी उत्तम कबड्डी, कुस्ती खेळत होतो. त्यातूनच माझी शरीरयष्टी तयार झाली. पोलीस विभागात नोकरी लागल्याने कायम तदुरुस्त राहणे व्यायाम करणे हा एक दिनचारियेचा भाग झाला. त्यातूनच मी जिम जॉईन केली. कालांतराने मला केवळ फिट रहाणे, बॉडी बनवणे या पुढे जाऊन या सलग्न अनेक क्रीडा प्रकार देखील आहेत या बद्दल माहिती झाले आणि मी या खेळातील पावर लिफ्टिंग खेळाकडे वळलो, अशी माहिती सुभाष कामडी यांनी दिली.

advertisement

शंभरीपर्यंत पाहिला नाही दवाखाना, 110 वर्षांच्या आजीबाईंच्या फिटनेसचं काय आहे रहस्य? Video

अव्याहतपणे खेळ खेळतो

तारुण्यात मी अनेक स्पर्धेत यश संपादन केले. त्यात 6 वेळा मी जिल्हास्तरीय, 7 वेळा राज्यस्तरीय, आणि एक वेळा जागतिक स्तरीय स्पर्धा खेळलो आहे. आजही मी अव्याहतपणे खेळ खेळतो आहे. मला या खेळातून शारीरिक तंदुरुस्थीसह मानसिक आणि आत्मिक समाधान लाभत असून माझा दिवस फार आनंदी जातो. आज वयाच्या 63 व्या वर्षी देखील मी सहज 175 किलो वजनाचे डेड लिफ्ट, 140 किलोचा स्कॉट आणि 75-80 किलोची बेंच प्रेस मारतो, असं सुभाष कामडी यांनी सांगितले.

advertisement

डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं होतंय? साथीने घातलं थैमान, कशी घ्यावी काळजी Video

करिअरच्या अनेक संधी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

आज मी या पावर लिफ्टिंग गेम्समध्ये मास्टर कॅटेगिरीमध्ये खेळतो. ज्यामध्ये वाजना नुसार 74 हा गट ठरवण्यात आला आहे. पोलिस विभागून निवृत्त झाल्यानंतर मी पूर्णवेळ या क्षेत्रात कार्यरत आहे. अनेकांना मी या खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरित करतो, त्यांना मार्गदर्शन करतो. कारण जिममध्ये येऊन केवळ फिट रहाणे, बॉडी बनवणे या पुढे जाऊन या सलग्न अनेक क्रीडा प्रकार आज ऊपलब्ध असून त्यात करिअरच्या अनेक संधी आहे. महाविद्यालयीन स्पर्धेपासून ते जागतिक स्तरावर अनेक स्पर्धा आहेत. त्यात शासनाच्या देखील लाभ आहे. त्यामुळे तरुणाईने याकडे एक करिअरच्या दृष्टीने देखील बघायला हरकत नाही, असे मत सुभाष कामडी यांनी बोलताना व्यक्त केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
वय फक्त आकडा, 63 वर्षांचे आजोबा 175 किलो वजन सहज करतात लिफ्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल