advertisement

डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं होतंय? साथीने घातलं थैमान, कशी घ्यावी काळजी Video

Last Updated:

सध्या डोळे येण्याची साथ प्रचंड फोफावली आहे. डोळे येण्याची लक्षणे आणि त्यावरील उपचार काय आहेत याबद्दल नेत्रतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

+
News18

News18

पुणे, 4 ऑगस्ट : महाराष्ट्रात सध्या डोळे येण्याची साथ प्रचंड फोफावली आहे. पुण्यात हजारो रुग्ण आढळले असून ही साथ वेगाने पसरत आहे. त्यामुळे डोळे येऊ नये म्हणून प्रत्येकानेच विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मुख्यतः संसर्गजनय आजारांची समस्या उद्भवते. डोळे येणे हासुद्धा एक संसर्गजन्य आजार आहे. डोळे येण्याची लक्षणे, त्यावरील उपचार तसेच या आजाराविषयीचे समज-गैरसमज याविषयी पुण्यातील नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय पाटील महत्त्वाची माहिती दिली आहे.
काय आहेत लक्षणे?
डोळे येण्याची लक्षणे कोणकोणती आहेत याबद्दल डॉ. संजय पाटील सांगतात की, दोन्ही डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये टोचल्यासारखे जाणवणे, डोळ्यांतून वारंवार पाणी येणे तसेच पापण्यांना सूज येणे ही लक्षणे आढळल्यास डोळे येण्याचा आजार उद्भवतो. या आजाराची लागण मुख्यतः पावसाळ्यात होते. डोळे आल्यास लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे असते. कोणतेही घरगुती उपाय न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
advertisement
उपचार आणि काळजी
डोळे येणे हे व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार असल्याने याला ठराविक औषधे नाहीत. पेशंटनुसार नेत्रतज्ज्ञ विशिष्ट औषधे देतात. यामध्ये पेशंटला 7 दिवस डोळ्यांची काळजी घेणे, डोळे स्वच्छ ठेवणे, गॉगल वापरणे ही खबरदारी घेणे आवश्यक असते. या आजाराचे सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून नेत्रतज्ज्ञ अँटिबायोटिक्स, ड्रॉप्स तसेच लुब्रिकेटिंग ड्रॉप्सचा वापर करतात.
advertisement
पेशंटच्या डोळ्यांत पाहिल्याने डोळे येतात हा गैरसमज
याचबरोबर डोळे आलेल्या पेशंटच्या डोळ्यांत पाहिल्याने डोळे येतात हा पूर्णतः गैरसमज आहे. डोळे आलेल्या व्यक्तीला हात लागल्यास आणि त्यानंतर आपल्या हातांचा संपर्क डोळ्यांशी झाल्यास डोळे येण्याचे इन्फेक्शन होते. हा आजार सौम्य आजार आहे. 100 टक्क्यांपैकी 2 ते 3 टक्के पेशंटमध्ये हा आजार गंभीरतेकडे वळू शकतो. या गंभीर प्रकारात 7 दिवसानंतर आजाराच्या दुसऱ्या फेजमध्ये बुबुळावरती 'किराटायसिस' नावाचा आजार सुरू होतो. यामध्ये बुबुळावरती छोटे छोटे स्पॉट्स येतात आणि ते रिकव्हर होण्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागतो, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं होतंय? साथीने घातलं थैमान, कशी घ्यावी काळजी Video
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement