बाळाच्या संगोपनासाठी स्तनदा मातांनी खीर का खावी? तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Last Updated:

बाळाच्या संगोपनासाठी त्याच्या आईची तब्येत चांगली असणे आवश्यक असते. आई सदृढ असेल तरच तिचे मुल सुदृढ राहू शकते.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर, 3 ऑगस्ट : आई होणं हा महिलांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव असतो. बाळा जन्मानंतर सुरुवातीचे काही महिने हे संपूर्णपणे आईंवर अवलंबून असते. या बाळाच्या संगोपनासाठी त्याच्या आईची तब्येत चांगली असणे आवश्यक असते. आई सदृढ असेल तरच तिचे मुल सुदृढ राहू शकते. या महिलांसाठी जगभरात ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ब्रेस्ट फिडिंग विक म्हणून साजरा केला जातो. या महिलांच्या आहार कसा असावा? याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
या महिलांच्या आहारामध्ये कर्बोदके,प्रथिनं, जीवनसत्व, खनिजे यासह सर्व गोष्टींचा समावेश असणे आवश्यक आहे. या मातांच्या आहारा खीर हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी सात दिवस वेगवेगळ्या प्रकारची खीर खाल्ली पाहिजे. आळीव, नाचणी, खारीक, खजुरी, खसखस, शेंगदाणे यांची खीर या महिलांनी खावी. त्यामधून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतं,' असा सल्ला कर्णिक यांनी दिला.
advertisement
डॉ. कर्णिक यांच्या सल्ल्यानुसार या महिलांनी जास्तीत जास्त पालेभाज्या खाव्यात. त्याचबरोबर कडधान्य मोड आलेले पदार्थही त्यांच्या आहारात हवेत. या मातांनी कच्चे पदार्थ हे जास्त प्रमाणात खाऊ नये. त्याचबरोबर सॅलड सारख्या पदार्थ खावेत. तसंच पाणी देखील मोठ्या प्रमाणात प्याला हवे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
या मातांनी केवळ दोन वेळेस जेवण न करता ते दिवसभरातून सहा वेळा जेवण  करायला पाहिजे. त्यामुळे त्यांची तब्येत अजून देखील चांगली राहील, असे कर्णिक यांनी स्पष्ट केले.
(टीप : या बातमीतील मत ही तज्ज्ञांची वैयक्तिक मत आहेत. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
बाळाच्या संगोपनासाठी स्तनदा मातांनी खीर का खावी? तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement