Detox Drink : निस्तेज चेहरा दिसेल तजेलदार, डिटॉक्स ड्रिंकनं चेहऱ्यावर येईल ग्लो, जाणून घेऊया घरातल्याच पारंपरिक मसाल्यांची उपयुक्तता
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बडीशेप, दालचिनी, लवंग, ओवा, जिरं हे नेहमीच्या वापरातले मसाले जेवणाचा स्वाद तर वाढवताताच पण हे एकत्र करुन तयार केलेलं डिटॉक्स ड्रिंक रोज प्यायल्यानं, त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार राहिल. कंटेंट क्रिएटर अर्चिता गुप्ता यांनी इंस्टाग्राम हँडलवर याची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई : डिटॉक्स ड्रिंक म्हटलं की, आवळा, हळद, लिंबू, काकडी असे पर्याय समोर दिसतात. तसंच ओवा, जिरं, बडीशेप, दालचिनी, लवंग वापरुनही एक डिटॉक्स ड्रिंक बनवता येईल.
बडीशेप, दालचिनी, लवंग, ओवा, जिरं हे नेहमीच्या वापरातले मसाले जेवणाचा स्वाद तर वाढवताताच पण हे एकत्र करुन तयार केलेलं डिटॉक्स ड्रिंक रोज प्यायल्यानं, त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार राहिल. कंटेंट क्रिएटर अर्चिता गुप्ता यांनी इंस्टाग्राम हँडलवर याची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement
डिटॉक्स ड्रिंकसाठीचं साहित्य: - एक चमचा ओवा, एक चमचा जिरं, एक चमचा बडीशेप, दालचिनीच्या काड्या, दोन-तीन लवंगा, एक वेलची
हे सर्व साहित्य रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नैसर्गिकरित्या त्वचा चमकदार दिसावी यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक उपयुक्त आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी, भांडं झाकणानं झाकून पाच ते दहा मिनिटं उकळवा. ते एका कपमधे, गाळून घ्या. डिटॉक्स ड्रिंक तयार आहे.
advertisement
हे डिटॉक्स ड्रिंक दिवसाच्या कोणत्याही वेळी पिऊ शकता. ते फक्त सकाळी किंवा संध्याकाळी पिणं आवश्यक आहे असं नाही. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि अशुद्धता बाहेर काढण्यास मदत होते, ज्यामुळे रंग चमकदार होतो. त्वचेसोबतच निरोगी आरोग्यासाठीही हे डिटॉक्स ड्रिंक उपयुक्त आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 3:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Detox Drink : निस्तेज चेहरा दिसेल तजेलदार, डिटॉक्स ड्रिंकनं चेहऱ्यावर येईल ग्लो, जाणून घेऊया घरातल्याच पारंपरिक मसाल्यांची उपयुक्तता