घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महिला व बालकल्याण विभागामार्फत या विधिसंघर्षग्रस्त मुलांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या मुलांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला करून रिमांड होममधून पलायन केलं आहे. सहा मुलं रिमांड होममधून पळून गेले आहेत. या मुलांच्या हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. पळून जाण्यापूर्वी त्यांनी रिमांड होममध्ये असलेल्या सामानाची आणि सीसीटीव्हीची देखील तोडफोड केली आहे.
advertisement
या घटनेनं खळबळ उडाली आहे, जी सहा मुलं रिमांड होममधून पळून गेली आहेत, त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. दरम्यान आता या प्रकरणात कपिल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
Dec 25, 2023 8:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
मोठी बातमी! नागपुरात सुरक्षा रक्षकाला मारहाण करत 6 विधिसंघर्षग्रस्त मुलं रिमांड होममधून पळाले
