TRENDING:

बायकोच्या स्टेटसवर अश्लील कमेंट, जाब विचारायला गेला अन् जीवाशी मुकला, मुंबईत पतीची निर्घृण हत्या

Last Updated:

पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईजवळील नालासोपारा पश्चिम परिसरात एका अत्यंत थरारक घटना घडली आहे. आपल्या पत्नीच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच दिवशी मृत तरुणाचा लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवशीच तरुणाची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आफताब शेख (२४) हा तरुण आपली पत्नी शबाना शेख (२२) हिच्यासोबत नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर भागात राहत होता. शुक्रवारी या दांपत्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. यामुळे शबाना हिने आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक स्टेटस ठेवलं होतं. हे स्टेटस पाहून मेहंदी हसन शेख (२२) या तरुणाने त्यावर अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट केली.

advertisement

एवढ्यावरच न थांबता, मेहंदी याने इन्स्टाग्रामवरही शबानाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आपल्या पत्नीबाबत झालेल्या या प्रकारामुळे संतापलेला आफताब, पत्नी शबानाला सोबत घेऊन शुक्रवारी सकाळी सुमारास नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर येथे राहणाऱ्या मेहंदीच्या घरी पोहोचला.

वादाचे पर्यावसान हत्येत

आफताबने जेव्हा मेहंदीला त्या अश्लील कमेंटबद्दल जाब विचारला, तेव्हा दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी संतापलेल्या मेहंदीनं धारदार चाकूने आफताबवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, आफताबचा जागीच मृत्यू झाला. लग्नाच्या वाढदिवशीच अशाप्रकारे तरुणाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

advertisement

आरोपीच्या मुसक्या आवळल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मेहंदी हसन शेख याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेहंदी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मृत आफताब आणि आरोपी हे पूर्वी एकमेकांचे शेजारी होते, त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून अधिकचा तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बायकोच्या स्टेटसवर अश्लील कमेंट, जाब विचारायला गेला अन् जीवाशी मुकला, मुंबईत पतीची निर्घृण हत्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल