TRENDING:

शेवटच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधन; वारकरी परिषदेच्या बैठकीनंतर घरी परतताना प्रसिद्ध कीर्तनकाराला ट्रकने चिरडलं

Last Updated:

वारकरी परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी ते आले होते. ही बैठक आटोपून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून गावी परतत होते

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड: कोणता प्रवास कधी शेवटचा ठरेल, हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक हृदयद्रावक घटना नांदेडमधून समोर आली आहे. यात आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धेवर प्रहार करणारे आणि समाजाला सन्मार्ग दाखवणारे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर (रा. बारूळ, ता. कंधार) यांचा अपघात झाला. मंगळवारी सायंकाळी झालेल्या या भीषण रस्ते अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेड शहरातील सिडको परिसरात एका भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये महाराजांचा जागीच अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचा अपघात
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांचा अपघात
advertisement

हभप मधुकर महाराज हे मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी ते आले होते. ही बैठक आटोपून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून गावी परतत होते. सिडकोतील रुबी हॉटेलजवळ पोहोचले असता, पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, महाराजांचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

नांदेडमधील जड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी असतानाही, सिडको आणि हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. विशेषतः ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा भरधाव ट्रकमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे रेअशा वाहनावर कायमस्वरूपी बंधन आणावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

हभप मधुकर महाराज बारूळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी परिषदेच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचे काम केले होते. त्यांच्या निधनाने प्रबोधन क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
शेवटच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधन; वारकरी परिषदेच्या बैठकीनंतर घरी परतताना प्रसिद्ध कीर्तनकाराला ट्रकने चिरडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल