अशोक चव्हाणांना मराठा समाजाचा घेराव
आरक्षणासाठी सुरू असलेलं मराठा समाजाचं आंदोलन आता राज्यभर पसरत आहे. या आंदोलकांच्या रोषाचा सामना आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील करावा लागला. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे आज काँगेसच्या कार्यक्रमासाठी माजी मंत्री अशोक चव्हाण गेले होते. काँगेस पदाधिऱ्यांनीची बैठक सुरू असताना बाहेर सकल मराठा समाजाकडून घोषणा बाजी सुरू होती. बैठक संपल्यानंतर अशोक चव्हाण जमावापुढे गेले. तेव्हा मोठा जमाव जमला होता. अशोक चव्हाण त्या जमावाला सामोरे गेले. त्याचवेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून घेराव घालण्यात आला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर अंदोलन सुरू आहे, मग तुम्ही असे कार्यक्रम का घेता? असा जाब एका युवकाने विचारला. त्याच सोबत तुमचा निषेध करतो, असं तो तरुण बोलला. त्याला उतर देताना तुझा पण निषेध, असं अशोक चव्हाण म्हणाले. हा व्हिडीओ सद्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पण अशोक चव्हाण यांनी धर्माबाद येथील काँगेसचा कार्यक्रम अर्धंवट सोडला नाही. हा प्रकार नंतर झाला असा दावा केला आहे.
advertisement
मराठा-कुणबी वाद उद्भवण्याची शक्यता
मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी घेऊन अंतरवाली सराटीमध्ये मराठा नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सुरुवातीला कुणबी नोंद असणाऱ्या मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी असलेल्या जरांगे यांनी नंतर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आणि वेगळ्या वादाला सुरुवात झाली.
वाचा - चंद्रकात पाटलांच्या कार्यक्रमात तरुणाचा गोंधळ, दादांनी जागेवरच सुनावलं, Video
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला अनिल देशमुख यांनी विरोध केला असून सरकार अशी मागणी मान्य करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देशमुख यांनी दिला. स्थानिक ओबीसी सेलचे भाजप पदाधिकारी यांनी देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध दर्शवित आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. सर्व शाखीय कुणबी आणि ओबीसी आंदोलन कृती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात सर्व पक्षीय कुणबी नेते एकत्रित आले होते. यात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.