Chandrakant Patil : चंद्रकात पाटलांच्या कार्यक्रमात तरुणाचा गोंधळ, दादांनी जागेवरच सुनावलं, Video

Last Updated:

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या भाषणावेळी शेतकरी तरुणानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान हा प्रकार घडला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात गोंधळ
चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात गोंधळ
पुणे, 9 सप्टेंबर : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या भाषणावेळी शेतकरी तरुणानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान हा प्रकार घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता सांगत असताना विरोधकांकडून सभेत गोंधळ घालण्यासाठी अशी लोकं पाठवली जातात, मुख्य वक्ता बोलत असताना प्रश्न विचारायचा आणि फोटो काढून भाषणात गोंधळ झाल्याचं व्हायरल करायचं, अशी पद्धत असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी तरुणाला सुनावलंय. दरम्यान सभेनंतर पोलिसांकडून या शेतकरी तरुणाची विचारपूस करण्यात आली, त्यावेळी त्याच्या खिशातून किटकनाशकाची बाटली सापडली.
भामा-आसखेड धरणातील पाणी भामा नदी पात्रात सोडण्याची कृष्णा टोपे या शेतकरी तरुणाची मागणी होती. माझा 45 वर्षांचा अनुभव आहे, अनेक मंत्रिपदं मी पाहिली आहेत. मुख्य वक्ता बोलत असताना असे प्रश्न विचारायचे आणि फोटो काढून भाषणात गोंधळ झाल्याचं व्हायरल करायचं अशी पद्धत आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrakant Patil : चंद्रकात पाटलांच्या कार्यक्रमात तरुणाचा गोंधळ, दादांनी जागेवरच सुनावलं, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement