नांदेड, 10 ऑगस्ट : प्रेमविवाहाला विरोध असूनही मुलीने त्याच मुलाशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने संतापलेल्या बापाने थेट मुलीला संपल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. ही घटना नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील मनू तांडा येथे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली.
काय आहे प्रकरण?
advertisement
मुलीच्या प्रेम विवाहाला वडिलांनी विरोध असतानाही मुलीने त्याच मुलाशी विवाह करण्याच्या हट्ट केला. तेव्हा वडिलांनी आपल्याच अल्पवयीन मुलीची कोयत्याने डोक्यावर वार करुन हत्या केली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसापूर्वी ही घटना घडली. मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. पोलिसांनी सखोल तपास करुन 8 दिवसानंतर खुनाचा हा प्रकार उघड केला. मनू तांडा येथील 16 वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील तरुणावर प्रेम होते. मयत मुलगी दहावीत शिकायला होती. त्यांच्या प्रेमाला वडील अण्णाराव राठोड यांचा विरोध होता. पण मुलीने त्याच मुलाशी लग्नाचा अट्टाहास केला. तेंव्हा रागाच्या भरात अण्णाराव राठोड यांनी कोयत्याने डोक्यावर वार करुन तिचा खून केला. 2 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. त्याच दिवशी मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करुन अंत्यसंस्कार केले. पोलिसांना ही महिती मिळाल्यावर सखोल तपास करण्यात आला. आठ दिवसाच्या तपसानंतर खुनाचा हा प्रकार उघड झाला. मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपी अण्णाराव राठोड याला अटक केली.
उत्तर प्रदेशमध्ये अशीच घटना
पीपरपूर भागातील रहिवासी असलेल्या या मुलीचे वेगळ्या धर्मातील मुलासोबत प्रेमसंबंध सुरू होते. याबाबत कुटुंबियांना कळताच समाजात बदनामी होईल या भीतीने तिला प्रेमाच्या बदल्यात त्यांनी थेट मृत्यूची शिक्षा दिली. आपली अल्पवयीन मुलगी शाळेत गेली असं सांगून प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती तिच्या वडिलांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन तिला भर बाजारात गाठलं आणि बेदम मारहाण केली. याबाबत पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मुलीने ‘हे लोक माझा जीव घेतील’, असं म्हणून पोलिसांना विनवण्या केल्या. मात्र घरगुती प्रकरण आहे आणि मुलगी अल्पवयीन आहे म्हणून पोलिसांनी सर्वांची समजूत काढून त्यांना घरी पाठवलं.
वाचा - दुचाकी पाडून घातला वाद, शिवीगाळ केल्याने जमाव संतप्त, तरुणासोबत घडलं भयानक
घरी गेल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला त्या मुलाचा विचार सोडून आपलं आयुष्य जगण्यास सांगितलं. त्याच्याशी लग्न झाल्यास समाजात आपली बदनामी होईल, असं देखील त्यांनी तिला समजावलं. मात्र मुलगी काही ऐकायला तयार नव्हती तिने प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट धरला. त्यानंतर वडील आणि भावाने तिला पुन्हा बेदम मारायला सुरुवात केली. या मारहाणीत तिचं डोकं भिंतीवर आपटलं आणि रक्त येऊ लागलं. रक्त पाहून कुटुंबीय घाबरले, त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाला होता.
आता मुलीच्या मृत्यूबाबत समाजाला काय सांगायचं असा प्रश्नदेखील कुटुंबियांना पडला, मग त्यांनी आजारपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचं सर्वांना सांगून तातडीने तिला दफन केलं. सर्व प्रकरण शांत झाल्यानंतर मुलीला बाजारात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाच्या मुसक्या आवळल्या.