advertisement

दुचाकी पाडून घातला वाद, शिवीगाळ केल्याने जमाव संतप्त, तरुणासोबत घडलं भयानक, वर्ध्यातील घटना

Last Updated:

रात्रीच्या सुमारास आकाशने दुचाकी पाडत वाद घातला गेला. यानंतर याठिकाणी धक्कादायक घटना घडली.

आकाश उईके
आकाश उईके
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा, 10 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. गोळीबार आणि चोरीच्याही घटनाही समोर येत आहेत. आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका युवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
काय आहे नेमकी घटना -
जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. आकाश उईके असे त्याचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास आकाशने दुचाकी पाडत वाद घातला गेला. यावेळी आकाशने वाद घालत शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त लोकांनी आकाश उईकेला लाठ्याकाठ्या दगडांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला.
advertisement
आता या घटनेनंतर हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार जणांना ताब्यात घेतले असून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आकाशवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाच्या हत्येची घटना घडली. जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी आकाश उईके याचा मृत्यू झाला. रात्रीच्या सुमारास आकाशने दुचाकी पाडत वाद घातला. यावेळी आकाशने वाद घालत शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त लोकांनी आकाश उईकेला लाठ्याकाठ्या दगडांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी आकाशचा मृत्यू झाला. मृत युवक आकाशवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
या घटनेनंतर हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/ वर्धा/
दुचाकी पाडून घातला वाद, शिवीगाळ केल्याने जमाव संतप्त, तरुणासोबत घडलं भयानक, वर्ध्यातील घटना
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement