TRENDING:

धक्कादायक! हसला म्हणून तरुणाचे दोन्ही हात मनगटापासून छाटले; नांदेडमधील प्रकारानं खळबळ

Last Updated:

नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नांदेड, 18 ऑगस्ट, मुजीब शेख : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून फळ विक्रेत्यानं कोयत्यानं तरुणाचे मनगटापासून दोन्ही हात तोडले आहेत. शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. मोहम्मद अजहर असं या हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो डी मार्ट परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. दरम्यान मोहम्मद अजहर या तरुणावर हल्ला करून हल्लेखोर फरार झाला आहे. त्याच्याविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

हसण्यावरून वाद 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  शुल्लक कारणावरुन एका फळ विक्रेत्याने भाजीपाला विकणाऱ्या तरुणाचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हात छाटले आहेत. नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात ही घटना घडली. मोहम्मद अजहर असं जखमी तरुणाचं नाव आहे. मोहम्मद अजहर हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याच शेजारी मोहम्मद तोहीद हा तरुण देखील हातगाड्यावर फळ विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला.

advertisement

त्यातुन दोघात मारमारी झाली. त्यानंतर आरोपी मोहम्मद तोहीद याने बाजारातून कोयता खरेदी करुन त्याला धार लावली. परत तो बाजारात आला. काही क्षणातच त्याने मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज याचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हात छाटले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या पायावर आणि पाठीवर देखील कोयत्याने वार केले. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
धक्कादायक! हसला म्हणून तरुणाचे दोन्ही हात मनगटापासून छाटले; नांदेडमधील प्रकारानं खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल