समोर आलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी बेड्या ठोकल्यानंतर पहिल्या दिवशी खरात कोठडीत एकदम शांत होता. त्याने मौनव्रत धारण केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे खरातने उत्तर दिले नाही. पोलीस वारंवार प्रश्न विचारत होते मात्र खरातने पोलिसांसमोर तोंड उघडले नाही. तक्रारीत पीडितेने केलेल्या आरोपावर देखील पोलिसांनी खरातला विचारले मात्र त्याने शांत राहणे पसंत केले.
advertisement
अखेर पोलिसी खाक्या दाखवत उलटतपासणी सुरू केली. त्यानंतर मौन धारण केलेला अशोक खरात संतापला. कोठडीत मोठ्याने ओरडायला लागला, डोळे मोठे करत थरथरत्या आवाडात घोर अपराध, घोर अपराध असे म्हणत ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून बाहेर उभे असलेले पोलीस कर्मचारी देखील आत घाबरून आले. मात्र काही वेळातच पोलिसांच्या पोलिसांच्या तड्याख्यामुळे काही वेळातच त्याला चांगलाच घाम फुटला आणि तो पुन्हा शांत झाला.
खरातच्या कारनाम्याची आता एसआयटीमार्फत चौकशी सुरु
नाशिकमध्ये तंत्रज्योतिषी कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याची आता एसआयटीमार्फत चौकशी सुरु झाली आहे. गुरुवारी दोन तास भोंदू अशोक खरातची एसआयटीच्या पथकानं चौकशी केली. भविष्यात या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनचं राज्य सरकारनं चौकशीसाठी एसआयटीची स्थापन केली आहे. भोंदू अशोक खरातवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात अशोक खरातचा एक पेनड्रायव्ह पोलीसांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये महिलांचे 58 अक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय.
खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर छापा
दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकानं अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर छापा मारला. या फॉर्म हाऊसमध्ये एक पिस्तूल पोलिसांच्या हाती लागलं आहे. तसेच काही जीवंत काडतूसं आणि वापरलेल्या काडतूसांच्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोबतच काही महत्त्वाचे दस्तावेज आणि मालमत्ते संदर्भातील कागदपत्र पोलिसांच्या हाती लागल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. आता खराच्या संपत्तीचा उलगडा होऊ लागला आहे.
एसआयटी चौकशीत त्याचे एक एक कारनामे उघड होणार
शिर्डीत मोक्याच्या ठिकाणी खरातच्या पत्नीच्या नावे जमीन असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षात त्यानं मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा पोलिसांना संशय आहे. तो सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. मर्चंट नेव्हीतून निवृत्ती घेतल्यानंतर खरात ज्योतिषशास्त्राकडं वळला. आणि अल्पावधीतचं त्यानं राजाश्रय मिळवला. अंगात दैवी शक्ती असल्याचं भासवून त्यानं मोठा भक्तवर्ग तयार केला होता. अघोरी उपायाच्या नावाखाली त्यानं महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा संशय आहे. आता एसआयटी चौकशीत त्याचे एक एक कारनामे उघड होणार आहेत.
