TRENDING:

CCTV, CDR आणि त्या महिला... कॅप्टनची पळता भुई थोडी होणार, तेजस्वी सातपुतेंचा प्लॅन तयार, कोणकोणत्या मुद्द्यावर चौकशी?

Last Updated:

भोंदूबाबा कॅप्टन खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : आडल्या नडल्या उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय महिलांना तुमच्या पीडा सोडवतो, असे म्हणून त्यांना दरबारात पाचारण करून काही भेटींनंतर त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वातील विशेष पोलीस पथकाकडून खरात याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान सुरुवातीला मौनव्रत धारण केलेला खरातने केलेल्या दृष्कृत्यांची माहिती द्यावी, यासाठी पोलिसांनी प्लॅन आखला आहे.
अशोक खरात-तेजस्वी सातपुते
अशोक खरात-तेजस्वी सातपुते
advertisement

लिंगपिसाट अशोक खरातची SIT कडून सध्या कोणत्या मुद्द्यांवर तपास?

भोंदूबाबा कॅप्टन खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत, आणखी काही महिला पुढे येण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेणे सुरू आहे. कॅप्टन खरातचे कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू आहे. तसेच कॅप्टन अशोक खरात याच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्याचे काम देखील एसआयटीकडून सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिसांनी सूत्रांनी सांगितले.

advertisement

खरात याच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज, अशोक खरात याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स तसेच विविध महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने एसआयटीचा पुढील तपास अवलंबून आहे. त्याच्या दृष्कृत्यांबद्दल पोलीस त्याला बोलते करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तो सध्या मौनव्रत धारण करून असल्याचे कळते. सीडीआर रिपोर्ट्स आल्यानंतर आणि उर्वरित महिलांनी तक्रार केल्यानंतर खरात याच्या गुन्हा करण्याच्या पद्धती समोर येतील.

advertisement

'कॅप्टन'ची गुन्हा करण्याची पद्धत काय होती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

एका पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, अशोक खरात हा स्वतःला कृष्णाचा अवतार सांगायचा. मी कृष्णाचा अवतार असून तू मागच्या जन्मातील माझी राधा होती, असे सांगून महिलेच्या डोक्यावर तो तांब्या-लोटा ठेवत असे. त्यापूर्वी तो पेढा आणि कडवट-खारट चव असलेले पाणी महिलांना प्यायला द्यायचा. पाणी प्यायल्यावर महिलांना गुंगी आली की त्यांचे लैंगिक शोषण करायला तो सुरुवात करीत असे, अशी गुन्हा करण्याची त्याची मोडस ऑपरेंडी होती.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CCTV, CDR आणि त्या महिला... कॅप्टनची पळता भुई थोडी होणार, तेजस्वी सातपुतेंचा प्लॅन तयार, कोणकोणत्या मुद्द्यावर चौकशी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल