नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात ही घटना घडली. जखमी तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोघंही हवेत फेकले गेले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संबंधित चारचाकी गाडीचा शोध लावला. धक्कादायक म्हणजे, हा अपघात करणारा मुलगा अल्पवयीन असून तो शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
घटनेचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे, तो अंगावर काटा आणणारा आहे. यामध्ये कारचा वेग प्रचंड असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणाऱ्या पालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.
