TRENDING:

सगळे भिडले, पण तो लढला! नाशिकमधील सर्वात हायव्होल्टेज लढतीचा निकाल आला, मुकेश सहाणेंचा विजय, दीपक बडगुजरांचा पराभव,

Last Updated:

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१५) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच आज १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१५) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच आज १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला. नाशिकमधील सर्वात हायव्होल्टेज लढतीचा निकाल आला आहे. अपक्ष उमेदवार मुकेश सहाणेंचा विजय झाला असून दीपक बडगुजरांना  पराभव स्वीकारावा लागला आहे.
Nashik Election 2026
Nashik Election 2026
advertisement

या निवडणुकीसाठी एकूण ७३५ उमेदवार रिंगणात असून, त्यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे व २०८ अपक्ष उमेदवार आहेत. अशातच यावेळी प्रभाग क्रमांक २९ ची लढत सर्वात लक्ष्यवेधी ठरली. या प्रभागामध्ये अपक्ष उमेदवार मुकेश सहाणे विरुद्ध भाजपचे दीपक बडगुजर यांच्यात लढत रंगली.

पैसे वाटपावरून उडाला गोंधळ

मतदानाच्या दिवशी शहरातील सावतानगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या अफवेमुळे मोठा गोंधळ उडाला आहे. आज मतदानाच्या दिवशीच माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर रोख रक्कम वाटली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती . या अफवेमुळे राजकीय वातावरण तापले असून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

advertisement

दोन्ही ठाकरे बंधूंचा पाठिंबा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

दुसरीकडे मुकेश सहाणे यांना दोन्ही ठाकरे बंधूंनी आपला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे, मुकेश शहाणे हे मूळचे भाजपचे उमेदवार होते. मात्र, तिकीट न मिळाल्यानंतर त्यांनी भाजपविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. आता मनसे आणि शिवसेना (उबाठा) यांचा पाठिंबा मिळाल्याने शहाणेंची ताकद वाढली होती.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सगळे भिडले, पण तो लढला! नाशिकमधील सर्वात हायव्होल्टेज लढतीचा निकाल आला, मुकेश सहाणेंचा विजय, दीपक बडगुजरांचा पराभव,
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल