नाशिक: नाशिकमध्ये तपोवनभूमीमध्ये कुंभमेळ्यासाठी वृक्ष तोडीला एकीकडे विरोध सुरू आहे. तर दुसरीकडे, सरकारनेही सावध भूमिका घेतली आहे. पण, तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा वाद कायम असताना नाशिक महानगरपालिकेने मलनिसारण केंद्र अर्थात STP प्लांट उभारणीसाठी तब्बल १२७० झाडांची कत्तल केली आहे. पालिकेनं या ठिकाणी १७ हजार झाडं लावण्याचा आश्वासन दिलं होतं, पण इथं फक्त ७०० झाडं लावली आहे. त्यामुळे पालिकेचा दावा हा साफ खोटारडा ठरला आहे.
advertisement
नाशिक महानगरपालिकेने मलनिसारण केंद्र अर्थात STP प्लांट उभारणीसाठी महापालिकेच्या वतीने १२७० झाडांची कत्तल करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, या तोडण्यात आलेल्या १२७० झाडांच्या बदल्यात पालिकेने १७ हजार झाडं लावण्याचा दावा केला आहे. मात्र न्यूज 18 लोकमतने पर्यावरण प्रेमींना सोबत घेऊन केलेल्या रिअलिटी चेकमध्ये पालिकेने केलेला हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
पालिकेने १७ हजार झाडे लावण्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात या ठिकाणी ७०० झाडं ही दिसून आली नाही. शिवाय जी झाड लावलेली दिसून आली आहे, ती देखील लावायची म्हणून लावल्याने सगळी जळून गेलेल्या अवस्थेत दिसून आली. नाशिक मधील पालिकेच्या या फोल दाव्याचा न्यूज 18 लोकमतने पर्यावरण प्रेमींच्या मदतीने रियालिटी चेक करत पर्दाफाश केला आहे.
तपोवनमधील वृक्षतोडीला स्थगिती
दरम्यान, नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाने स्थगिती दिली आहे. 15 जानेवारीपर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेतज्ञ अँडव्हॉक्ट श्रीराम पिंगळे यांनी माहिती दिली. मात्र, अहवालात प्रत्येक झाडांची उपुक्तता आणि तोडण्याची कारणे द्यावी लागणार असल्याने लवादाने वृक्षतोडीला दिलेली स्थगिती बराच काळ राहील, असं याचिकाकर्ते पिंगळे यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, नदीकाठच्या हरित पट्ट्यातली झाडे तोडून तिथं प्रदर्शन केंद्र उभारले जात असून, त्यासाठी केली जाणारी बेसुमार वृक्षतोड बेकायदेशीर असल्याची बाब अधोरेखित करत वृक्षतोडीला स्थगिती द्यावी त्याचं बरोबर तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हजारो नागरिकांचा विरोध असल्याची बाब ऍडव्होकेट पिंगळे यांनी हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली.
