तब्बल 50 वर्षांनंतर ‘शोले’चं रिलीज, चित्रपटातील सीन पाहून छ. संभाजीनगरकर म्हणाले… VIdeo

Last Updated:

तब्बल 50 वर्षानंतर आज 12 डिसेंबर रोजी शोले हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आहे. 4 के रिस्टोरेशन, मूळ उत्कर्षबिंदू आणि हटवलेले दोन सीन पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये विशेष दिसून आली.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : तब्बल 50 वर्षानंतर आज 12 डिसेंबर रोजी शोले हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आहे. 4 के रिस्टोरेशन, मूळ उत्कर्षबिंदू आणि हटवलेले दोन सीन पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये विशेष दिसून आली. काहींना जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर तरुणांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर शोले अनुभवल्याचा अनुभव अविस्मरणीय वाटला. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील चित्रपट प्रेमींना शोले द फायनल कट हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची काय पहिली प्रतिक्रिया आहे पाहुयात.
छत्रपती संभाजीनगर येथील अंजली चित्रपटगृहात आज शोले द फायनल कट हा चित्रपट अनेक प्रेक्षकांनी पाहिला आहे. मात्र इतर चित्रपट गेल्या आठवडाभरामध्ये प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटाला कमी प्रतिसाद मिळाला आहे, कारण की या चित्रपट गृहामध्ये जास्त ज्येष्ठ प्रेक्षकांची संख्या होती तर तरुणांमध्ये काही मोजकेच प्रेक्षक दिसून आले. मात्र येणाऱ्या आठवडाभरामध्ये या चित्रपटाला मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहतील, अशी अपेक्षा शोले प्रेमी विवेक चिसके यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
advertisement
शोले द फायनल कट या चित्रपटामध्ये पहिला बदल म्हणजे या चित्रपटाचा शेवट बदललेला आहे.1975 मध्ये आलेल्या शोले या चित्रपटामध्ये गब्बरला (अमजद खान) मारलेलं दाखवलेलं नाही मात्र शोले द फायनल कट या चित्रपटामध्ये गब्बरला मारलेलं दाखवलेलं आहे. तसेच फाईट सीन वाढवलेले आहे, या चित्रपटाला तीन वर्षांपासून पॉलिश आणि एडिट करायला वेळ लागला आहे ते बरोबर आहे आणि त्याप्रमाणे चित्रपट उत्तमरीत्या पॉलिश झाला आणि प्रत्येक फ्रेम छान वाटली, अशी विवेक चिसके प्रतिक्रिया आहे.
advertisement
शोले चित्रपटात काय बदल झाला?
शोले द फायनल कट या चित्रपटाचा ठराविक अनुभव नव्या साऊंड आणि स्पष्ट असलेल्या प्रिंटमुळे हा चित्रपट एकदम ताजा वाटला आहे. या चित्रपटामध्ये अगोदर कट केलेले काही सीन पुन्हा पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये ठाकूर (संजीव कुमार) यांच्या पात्रातील त्यांचे बूट बनवण्याचा सीन देखील पाहायला मिळतोय, अशी प्रतिक्रिया शोले द फायनल चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
तब्बल 50 वर्षांनंतर ‘शोले’चं रिलीज, चित्रपटातील सीन पाहून छ. संभाजीनगरकर म्हणाले… VIdeo
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement