TRENDING:

नाशिक पोलिसांचा अजब कारभार,अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल; नातेवाईक संतप्त

Last Updated:

मृत दिनकर झिटे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कुटुंबीय संतप्त झाले असून पोलीस आयुक्तांना भेटून यासंदर्भात निवेदन देणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक:  शहरात मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 60 वर्षीय व्यक्तीचा खड्ड्यामुळे दुचाकी वरून पडून मृत्यू झाला होता या व्यक्तीवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक संतप्त झाले आहेत.
News18
News18
advertisement

महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यामुळे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुंजाळ मळा या ठिकाणी साठ वर्षीय दिनकर झिटे या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला . या घटनेनंतर पोलिसांनी मयत असलेल्या दिनकर झिटे यांच्यावर स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. मयत दिनकर झिटे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कुटुंबीय संतप्त झाले असून पोलीस आयुक्तांना भेटून यासंदर्भात निवेदन देणार आहेत.

advertisement

कुटुंबाचे म्हणणे काय?

दरम्यान जे यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मयत दिनकर यांच्या मुलाने केली आहे. ज्या रस्त्यावर आपण जोरात गाडी चालू शकत नाही असे असताना पोलिसांनी तक्रारीत बेधडकपणे आणि वेगाने चालवण्याचा उल्लेख केला असून या गोष्टी चुकीच्या असून आम्हाला मान्य नसल्याचं त्यांच्या नातलगाकडून सांगण्यात आले आहे.

advertisement

नातेवाईक संतप्त

नाशिक शहरातील खड्डे नाशिककरांना प्रवासादरम्यान प्रचंड डोकेदुखी ठरत आहे अनेक वाहनांचे किरकोळ स्वरूपात अपघात देखील होत आहेत यामध्ये वाहन चालकांना देखील दुखापत होत आहे मात्र तरी देखील महापालिका प्रशासन खड्ड्यांच्या बाबतीत मूग गळून गप्प असल्याचं पाहायला मिळतंय . ज्या खड्ड्यांमुळे मृत्यू झाला त्या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना सोडून मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केल्याने  नातेवाईक संतप्त झाले आहे.

advertisement

नाशिक पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी देखील या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तपास करत असताना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाले आणि त्यांच्या सांगण्यावरून मळ्यात झालेले दिनकर झिटे हे वेगाने दुचाकी चालवत होते. तसेच त्यांच्या दुचाकीला लाईटही नव्हता आणि हेल्मेटही घातलेले नव्हतं त्यामुळे ती स्वतःच त्यांच्या मृत्यूला करणीभूत ठरले असल्यास सांगण्यात आला आहे.

advertisement

गुन्हा दाखल होणार का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोजागिरीला बनवा अमृतासारखं मसाले दूध, स्पेशल रेसिपी 5 मिनिटांत तयार, Video
सर्व पहा

अपघातात मयत झालेल्या व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कुटुंबीय देखील संतप्त झाले आहेत तर नागरिकांमधून देखील या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागले आहेत खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.  मात्र ज्यांच्यामुळे खड्डा झाला त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय..

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक पोलिसांचा अजब कारभार,अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल; नातेवाईक संतप्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल