TRENDING:

अशोक खरातचे व्हिडिओ ग्रुपवर आहेत? लगेच डिलीट करा... नाशिकपासून सुरू झाली कारवाईला सुरुवात

Last Updated:

अशोक खरात प्रकरणाशी संबंधित एकूण आठ अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहरातील सातपूर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सहा जणांसह काही व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको आणि सातपूर वॉलमन या व्हॉट्सॲप ग्रुपवर संबंधित व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याचे उघड झाले असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात प्रकरणाशी संबंधित एकूण आठ अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. या व्हिडिओंमध्ये पीडित महिलांचे खासगी क्षण दाखवण्यात आले असून, ते व्हायरल केल्यामुळे संबंधित महिलांच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे.

कुणाकुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला?

या प्रकरणात सिद्धार्थ रामोशे, रमीज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे आणि साहिल सय्यद यांच्यासह इतर काही ग्रुप ॲडमिन्सचा समावेश असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत असेही निष्पन्न झाले आहे की, काही ॲडमिन्सनी स्वतः व्हिडिओ पोस्ट करण्याबरोबरच ते पुढे इतर ग्रुप्समध्ये फॉरवर्ड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

advertisement

इतर आरोपींचा शोध सुरू, लवकरच अटकेची शक्यता

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

व्हिडीओ फॉरवर्ड कराल तर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा, मराठी चित्रपटसृष्टीसाठी हक्काचं थिएटर, भारत माता सिनेमा पुन्हा सुरू, Video
सर्व पहा

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोणत्याही प्रकारचा अश्लील, आक्षेपार्ह किंवा गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर किंवा व्हिडिओ शेअर करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोक खरातचे व्हिडिओ ग्रुपवर आहेत? लगेच डिलीट करा... नाशिकपासून सुरू झाली कारवाईला सुरुवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल