10 लाखांचं कर्ज आणि धमक्या
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निशा वाकडे (रा. स्नेहबंधन पार्क) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक वाकडे यांनी जानेवारी महिन्यात संशयित सावकारांकडून १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज त्यांना ३.५ टक्के प्रतिमहिना या दराने देण्यात आले होते, जो अवैध सावकारीचा प्रकार आहे.
advertisement
फ्लॅट विक्रीची आणि बेघर करण्याची धमकी
पोलीस उपनिरीक्षक असूनही, अवैध सावकारांकडून कर्ज घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. कर्ज घेताना त्यांनी आपला फ्लॅट गहाण ठेवला होता. परंतु, कर्जवसुलीसाठी या सावकारांनी त्यांना दमदाटी सुरू केली. कर्ज वेळेत न फेडल्यास गहाण ठेवलेला फ्लॅट विकण्याची आणि त्यांना बेघर करण्याची धमकी या महिला सावकाराने दिली.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिस उपनिरीक्षक वाकडे यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी विक्की कुमावत, सोनाली, देवयानी आणि अनंता पवार या चार संशयितांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम, १९४६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सोनाली नावाच्या एका महिला संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
