घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणी अर्धनग्न अवस्थेत होती. तिच्या गळ्यात चाकू अडकला होता. तसेच बाजुले अर्धवट खाल्लेला पिझ्झाही आढळून आला होता. आता या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपासचक्रं फिरवत घटनेची उकल केली आहे. अवघ्या काही तासांत पोलिसांनी हत्येचा छडा लावला आहे. ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर तरुणीच्या एक्स प्रियकरानेच केल्याची माहिती आता समोर आली आहे.
advertisement
पोलिसांनी नाशिकमधील सारूळच्या जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मृत मुलगी बुलढाण्याची असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. तरुणीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीनं तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण काही वर्षांपूर्वी नाशिकच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. याच काळात त्याची पीडितेशी ओळख झाली होती. याच ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण अलीकडेच काही कारणास्तव दोघांमध्ये अंतर निर्माण झालं होतं. प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण आरोपीला लागली होती. प्रेयसीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याने ती आपल्याला इग्नोर करतेय, याच भावनेतून आरोपी प्रियकराने तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून एकाचा नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे.
