TRENDING:

गर्भवती असतानाच त्याने... भोंदूबाबा अशोक खरातचं नवं कांड, पीडितेने आपबीती सांगितली, नाशिक पोलिसही हादरले

Last Updated:

भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. महिला अत्याचार प्रकरणात नाशिक पोलिसांनी त्याच्यावर बुधवारी रात्री अटकेची कारवाई केली. सध्या विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याने केलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरण अत्यंत निर्णायक वळणावर येऊन ठेपले असून आणखी एका महिलेने पुढे येऊन कॅप्टनविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक खरात
अशोक खरात
advertisement

भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. महिला अत्याचार प्रकरणात नाशिक पोलिसांनी त्याच्यावर बुधवारी रात्री अटकेची कारवाई केली. सध्या विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. शेकडो महिलांवर त्याने अत्याचार केल्याचा संशय आहे. त्याच्या कार्यालयातून जवळपास ५८ व्हिडीओ पोलिसांच्या हाताला लागले आहेत. पीडित महिलांना धीर देऊन पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले जात असताना नाशिकमध्ये एका महिलेने हिमतीने खरात याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

advertisement

नवऱ्याला बाहेर बसवून ठेवायचा, नकली साप आणि नकली वाघाचे कातडी दाखवून घाबरवायचा

पीडित महिला गर्भवती असताना नराधम अशोक खरातने लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिने पोलिसांत दिली. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने लैंगिक अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. जर याची कुठे वाच्यता केली तर पीडिता आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

advertisement

नराधम खरात महिलेसोबत येणाऱ्या पतीला बाहेर बसवून लैंगिक शोषण करत असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. नराधम अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाचे कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएनएस ६४ (१) ७४/३५१ (२) कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

अशोक खरात याच्यावरील पहिल्या FIR तक्रारीत काय म्हटलंय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिक बाबांनी स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखालील फिर्यादी यांच्या मनात विश्वास निर्माण करून त्याचे वरील ऑफिसचे ठिकाणी बोलावून फिर्यादी यांचा धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ खायला आणि पाणी पिण्यास देऊन फिर्यादीस संमोहित करून आणि त्यानंतर फिर्यादीचे आयुष्य बरबाद करून टाकेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या पतीच्या मरणाची भीती घालून फिर्यादीची इच्छा नसताना फिर्यादीवर वारंवार बलात्कार केले म्हणून फिर्यादीची अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन राहणार फ्लॅट नंबर 37 तृप्त बाला, सर्व्हे नंबर 777/2/1, कर्मयोगी नगर, तिडके कॉलनी, गोविंद नगर लिंक रोड नाशिक या भोंदू बाबा विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गर्भवती असतानाच त्याने... भोंदूबाबा अशोक खरातचं नवं कांड, पीडितेने आपबीती सांगितली, नाशिक पोलिसही हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल