TRENDING:

मामाच्या घरुन निघाली अन् बसमध्ये नराधमानं हेरलं.., मुलीसोबत जंगलात नको ते घडलं, नाशिकला हादरवणारी घटना!

Last Updated:

Nashik News: मामाच्या घरून आई-वडिलांकडे जाण्यासाठी निघालेल्या एका १५ वर्षीय मुलीसोबत नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Nashik News: मामाच्या घरून आई-वडिलांकडे जाण्यासाठी निघालेल्या एका १५ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला जंगलातील पडक्या घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. म्हसरूळ पोलिसांनी अत्यंत चातुर्याने आरोपींच्या 'कोडवर्ड' भाषेतील चॅटिंगवरून माग काढत वडाळीभोईच्या जंगलातून मुलीची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
nashik girl kidnapped (Ai generated Photo)
nashik girl kidnapped (Ai generated Photo)
advertisement

नेमकी घटना काय?

मखमलाबाद येथे मामाकडे राहून शिक्षण घेणारी ही मुलगी ४ मार्च रोजी दिंडोरी तालुक्यातील उंबराळे येथे आपल्या आई-वडिलांकडे जाण्यासाठी बसने निघाली होती. बस प्रवासात संशयित आरोपी शिवाजी हिरे याने तिला बसण्यासाठी जागा दिली आणि तिची दिशाभूल केली. तिला उंबराळे येथे उतरू न देता त्याने युक्तीने तिला आपल्या घरी नेले.

advertisement

असा रचला कट

शिवाजी हिरे हा लग्नं जमवण्याचं काम करतो. त्याने रात्रीच आपला भाचा दिलीप महाले आणि त्याचा मुलगा विकास महाले यांना बोलावून घेतलं. या दोघांनी मुलीला हस्ते दुमाला येथे नेले. मात्र, दरम्यानच्या काळात मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आरोपी घाबरले. बिंग फुटू नये म्हणून त्यांनी रोशन जाधव याच्या मदतीने मुलीला वडाळीभोई येथील जंगलात एका निर्जन, पडीक घरात डांबून ठेवलं.

advertisement

पोलिसांचा 'डिजिटल' तपास आणि कोडवर्ड

सहायक निरीक्षक उमेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुलीच्या सुमारे ३० ते ३५ मित्रांची कसून चौकशी केली. तपासादरम्यान एका तरुणाने मुलीला हस्ते दुमाला येथे पाहिल्याचं सांगितलं. पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेत संशयितांचे मोबाईल ताब्यात घेतले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कोडवर्ड वापरत होते.

advertisement

२ डॉट (..) म्हणजे ऑनलाइन येणे, १ डॉट (.) म्हणजे ऑफलाइन जाणे आणि चॅटिंग झाल्यानंतर मेसेज लगेच डिलीट केले जात होते. पोलिसांनी या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे वडाळीभोईच्या जंगलात छापा टाकला आणि मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तपासात असं समोर आलं आहे की, आरोपी शिवाजी हिरे हा बसस्थानक किंवा बसमध्ये एकट्या असलेल्या मुलींना हेरायचा. लग्नाचं आमिष दाखवून किंवा दिशाभूल करून त्यांना आपल्या घरी न्यायचा. या टोळीने आणखी किती मुलींची अशी फसवणूक केली आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
मामाच्या घरुन निघाली अन् बसमध्ये नराधमानं हेरलं.., मुलीसोबत जंगलात नको ते घडलं, नाशिकला हादरवणारी घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल