TRENDING:

Jamkhed Milk Adulteration: दूध आहे की विष? गोठ्यातच भेसळीचे रॅकेट उघड; तिघांना अटक

Last Updated:

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यामध्ये अन्न- औषध प्रशासन विभागाकडून माणसाच्या आरोग्याला हानिकारक असलेलं आणि रसायनांनी मिश्रित दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुध भेसळीच्या मुद्द्यावरून अनेकदा नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. अन्न- औषध प्रशासन विभागाकडून माणसाच्या आरोग्याला हानिकारक असलेलं आणि रसायनांनी मिश्रित दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अन्न- औषध प्रशासन आणि पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये कारवाई करत तीन शेतकऱ्यांना अटक केली. अहिल्यानगरच्या अन्न- औषध प्रशासन विभागाला जिल्ह्यातील काही शेतकरी दुधामध्ये भेसळ करत असल्याची माहिती मिळाली. त्याच आधारावर त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फकराबाद गावामध्ये अन्न- औषध प्रशासन त्यांच्या टीमसह पोहोचले.
News18
News18
advertisement

गोठ्यातच भेसळीचे रॅकेट उघड

दूध भेसळीचा पर्दाफाश करताना अन्न- औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक करत दूध भेसळीचे साहित्यही जप्त केले. अन्न- औषध प्रशासनाने आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या फकराबाद गावामध्ये कारवाई केलेली आहे. फकराबादमधील शेतकर्‍यांच्या गोठ्यामध्ये भेसळ युक्त दूध विकलं जात असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच टीम फकराबादमध्ये दाखल झाली, लगेचच त्यांनी कारवाई करायलाही सुरूवात केली. या टीमने दूध भेसळ करण्याच्या साहित्यासह तिघांना अटक केली आहे. अहिल्या नगरमधील ग्रामीण भागातल्या दूध भेसळीच्या प्रकारामुळे अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखा ॲक्टिव्ह मोडवर आली आहे.

advertisement

कोण- कोण होते सहभागी

केलेल्या कारवाईमध्ये अनेक रसायने आणि इतरत्र दूध भेसळीचं साहित्यही जप्त केल्या आहेत. रामदास उबाळे, समीर शेख आणि आफताब सेफ या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून कारवाईदरम्यान दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पॅराफेन लिक्विड हे रसायनसह इतर रासायनिक पदार्थही जप्त केले आहे. वेगवेगळ्या पद्धतीतून दूध भेसळीचे प्रकार फकराबाद गावामध्ये घडत होते. वेगवेगळ्या पद्धतीतून सुरू असलेल्या भेसळीचा प्रकार पाहून पोलिसांसह अन्न औषध प्रशासनही चक्रावून गेले. या सर्व प्रकरणामध्ये शेतकरी आणि व्यापाराचा सहभाग होता. व्यापारी शेतकऱ्याच्या मदतीने दूधामध्ये भेसळकरून नागरिकांना दूध सप्लाय करत होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

संपूर्ण गावामध्ये टीमने शोध मोहिम करत दुधाची भेसळ करणार्‍यांना अटक केली आहे. खरंतर, रसायनामुळे नागरिकांच्या जीवावर काय दुष्परिणाम होतील? हा प्रश्न मनामध्ये उद्भवला नसेल का? या दुधामुळे शरीरावर काय दुष्परिणाम होत असतील? याची त्यांना भीती वाटत नाही का?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Jamkhed Milk Adulteration: दूध आहे की विष? गोठ्यातच भेसळीचे रॅकेट उघड; तिघांना अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल