महत्त्वाचे बदल आणि फायदे
गावातच मिळणार उपचार: आतापर्यंत ही योजना केवळ खासगी आणि मोठ्या सरकारी रुग्णालयांपुरती मर्यादित होती. मात्र, आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येच जखमेवर टाके घालण्यापासून ते किरकोळ शस्त्रक्रियांपर्यंतचे उपचार मोफत होतील.
35 प्रकारच्या उपचारांची सुविधा: प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेषतः 35 प्रकारचे उपचार या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये संसर्गजन्य आजार आणि अपघाती प्राथमिक उपचारांचा समावेश आहे.
advertisement
5 लाखांपर्यंतचे कवच: पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार या योजनेतून मिळत राहतील.
राज्य सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या योजनेत समावेश केल्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होईल. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आणि मोफत उपचार मिळणे सोपे होणार असल्याची माहिती डॉ. पंकज भदाणे, समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना यांनी दिली आहे.
नोंदणी प्रक्रिया सुरू
राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेशी जोडण्यासाठी सध्या नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जे केंद्र आवश्यक निकष पूर्ण करतील, त्यांना तत्काळ या योजनेची मान्यता देऊन तिथे उपचार सुरू केले जाणार आहेत. या निर्णयामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.






