मुंबई सीएसएमटी ते गोरखपूर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस दररोज रात्री 10.30 वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटणार असून गोरखपूरला तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पोहोचणार आहे. ही समर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस 15 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये चालवली जाणार आहे. तर, गोरखपुरवरून दररोज दुपारी 02.30 वाजता सुटणार असून मुंबई सीएसएमटी स्थानकावर तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.30 मिनिटांनी पोहोचणार आहे. ही ट्रेन महाराष्ट्रामध्ये दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगांव आणि भुसावळ या स्थानकावर थांबणार आहे. या हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसमुळे प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
यासोबतच आणखी एक हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांमध्ये धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते समस्तीपूर (बिहार) ही सुद्धा एक्सप्रेस सुटीच्या दिवसांमध्ये धावणार आहे. साप्ताहिक स्पेशल एसी एक्सप्रेस 21 मार्च ते 14 जुलै या दिवसांमध्ये धावणार आहे. प्रत्येक मंगळवारी दुपारी 12.15 वाजता ही एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार आहे. तर हिच एक्सप्रेस समस्तीपूरला बुधवारी रात्री 11.45 वाजता पोहोचेल. तर, 23 मार्च ते 16 जुलै या दिवसांमध्ये ही साप्ताहिक स्पेशल एसी एक्सप्रेस प्रत्येक गुरूवारी पहाटे 03.00 वाजता ही एक्सप्रेस समस्तीपूरवरून सुटणार आहे. तर हिच एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसला शुक्रवारी दुपारी 04.25 वाजता पोहोचणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आणखी एक एक्सप्रेस धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस या मार्गावर आणखी एक समर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी आणि गुरूवारी दुपारी 12.15 वाजता सुटेल. तर, बनारसला दुसऱ्या दिवशी रात्री 11.30 वाजता पोहोचेल. तर प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी आणि शनिवारी ही ट्रेन बनारस स्थानकावरून पहाटे 5.30 वाजता सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.40 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगांव, भुसावळ जंक्शन या स्थानकांवर महाराष्ट्रातील या स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे.
