TRENDING:

Nashik News: चैत्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी विशेष बसेसचे नियोजन

Last Updated:

चैत्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्सवामध्ये भाविकांना विशेष बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष बसेसचे कसे नियोजन असेल, एकदा जाणून घेऊया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: सप्तश्रृंग गडावर आजपासून चैत्रोत्सव सुरू आहे. चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंग गडावर 26 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत विशेष बससेवा सुरू राहणार आहे. चैत्रोत्सवानिमित्त भाविकांना गडापर्यंत विशेष बससेवा पुरवली जाणार आहे. शिवाय, चैत्रोत्सवाच्या काळामध्ये खासगी वाहतूक सुद्धा बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांना एसटी बसेसने देवीच्या दर्शनासाठी जावं लागणार आहे. सप्तश्रृंगी देवीच्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावापासून ते देवीच्या गडापर्यंत ही बससेवा राहणार आहे. यामुळे भाविकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
News18
News18
advertisement

चैत्रोत्सवाच्या काळामध्ये, देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना खासगी वाहनाने गडावर येता येणार नाही. गडाच्या पायथ्याजवळ असणार्‍या नांदुरी गावापासून गडापर्यंत खासगी वाहने बंद राहणार आहे. त्या काळात 300 बसेसची सोय भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. चैत्रोत्सवाच्या काळामध्ये देवीच्या मंदिरामध्ये नऊ दिवस अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. रामनवमी अर्थात आजपासून अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या काळामध्ये भाविकांची मोठ्याप्रमाणावर गर्दी होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशी ही रुग्णसेवा, छ. संभाजीनगरमध्ये गरजूंना होतीये मोठी मोफत मदत, अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यामुळे मंदिर ट्रस्टकडून मंदिराच्या परिसरातील खासगी वाहनांना नो एन्ट्री देण्याचे ठरवले आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर ट्रस्टने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिर ट्रस्टने बसेसच्या सोयींसोबतच आरोग्य पथके, पाणी पुरवठा, स्वच्छता गृहे, अग्निशमन दल आणि पोलीस बंदोबस्त असे वेगवेगळे पथके या काळात तैनात करण्यात आलेले आहेत. चैत्रोत्सवाचा सोहळा आनंदात करण्यासाठी मंदिर ट्रस्टकडून पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: चैत्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी विशेष बसेसचे नियोजन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल