नाशिकमधील प्रवाशांकडून होत असलेली मागणी लक्षात घेता वाहतूक विभागाकडून लवकरात लवकर बस सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पिंपरी नाक्यावर मोठ्या प्रमाणावर सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे त्या परिसरातून सिटी लिंक बस चालवण्याची मागणी केली जात आहे. या परिसरामध्ये अनेक कर्मचारी, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांचं येणं जाणं मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे त्यांच्या दृष्टीने पिंपरी नाक्यावर बस चालवण्याची मागणी केली जात आहे. बराच वेळ या बस स्थानकावर प्रवाशांना थांबावं लागत असल्यामुळे प्रवाशांनी बसची मागणी केलेली आहे.
advertisement
पिंपरी नाक्यावर बस थांबावी, यासाठी विजयनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले यांच्याकडे या मार्गावरील बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या मागण्यांचा विचार करत नगराध्यक्षांनी सिटी लिंक बसच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत चर्चा करत जुन्या मार्गावरून बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेनुसार बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीमध्ये नगरसेवक आणि वकील पंकज जाधव आणि मनोज देशमुख यावेळी उपस्थित होते. त्यांनी स्थानिक पातळीवरील समस्यांवर चर्चा केली.
सिन्नर तालुक्यातील नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत, "आम्हाला सिटी लिंक बससोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे. तांत्रिक पैलूंची चर्चा करून लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याची माहिती देण्यात आलेली आहे. यामुळे सिन्नर- नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिन्नर शहराचा विकास करताना समाजातील प्रत्येकाचा घटकाचा विचार करून विकास करायचा आहे. आम्ही सिन्नरमधील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत."
