TRENDING:

वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे स्वप्न पूर्ण, नाशिकमधील वात्सल्य फाऊंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम

Last Updated:

सदर संस्थेमार्फत चालवले जाणारे वात्सल्य वृद्धाश्रम हे विना अनुदानित असून संस्थेच्या मालकीची जागा अजून नाही. त्यामुळे भाडे तत्वावर असलेल्या जागेत आश्रम चालविण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
advertisement

नाशिक : नाशिकमध्ये पंचवटी आणि गंगापूर रोडवर वात्सल्य वृद्धाश्रम आहे. मागील 13 वर्षांपासून वात्सल्य फाऊंडेशन संचालित वात्सल्य वृद्धाश्रमात समाजातील सर्व अनाथ, असहाय, निवृत्त, एकाकी, पोलिस स्टेशन तर्फे आलेल्या आणि अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींसाठी सेवा देण्याचे कार्य केले जात आहे. जवळपास 140 आजी-आजोबांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर संस्थेमार्फत चालवले जाणारे वात्सल्य वृद्धाश्रम हे विना अनुदानित असून संस्थेच्या मालकीची जागा अजून नाही. त्यामुळे भाडे तत्वावर असलेल्या जागेत आश्रम चालविण्यात येत आहे. हा आश्रम हा समाजातील दानशूर, दानदात्यांच्या मदतीने चालवला जातो. त्यात समाजातून विविध प्रकारची मदत, जसे की कोणी आपल्या लाडक्या व्यक्तींचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, पुण्यस्मरण किंवा विविध प्रकारचे सण उत्सव आश्रमात येऊन सर्व आजी-आजोबांसोबत साजरे करतात.

advertisement

त्यानिमित्ताने येथे अन्नसेवा देऊन, वस्तू स्वरूपात, मेडिकल सेवा किंवा पैसे स्वरूपात मदत करत असतात. यामुळे हे कार्य अखंडपणे चालू आहे. तसेच वास्तल्य फाउंडेशन हे नवनवीन उपक्रम राबवित असतात. आजदेखील त्यांनी सर्व आजी आजोबांना बाहेर फिरवायचा उपक्रम राबविला. यामध्ये त्यांनी एका कार मॉलला भेट दिली. यानिमित्ताने ज्या आजी आजोबांचे स्वप्न होते कि मोठ्या गाडीत आपण फिरायला हवे, त्या आजी आजोबांचे स्वप्न आज पूर्ण झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

सर्वांनी मोठ्या गाड्यांचा आज अनुभव घेतला. या सर्वांच्या चेहऱ्यावर मोठे स्मितहास्य आणि समाधान दिसत होते. त्यानंतर सर्वांनी मोठ्या हॉटेलमध्ये जेवणाचा आनंदही घेतला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे स्वप्न पूर्ण, नाशिकमधील वात्सल्य फाऊंडेशनचा कौतुकास्पद उपक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल