काय घडलं नेमकं?
सुरगाण्यातील उंबरठाण, निवरापाडा, चुली, राशा आणि गोंडाळविहीर या भागात भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. ५ मार्चच्या रात्री ११:५२ वाजता जेव्हा सगळं जग झोपलेलं होतं, तेव्हा अचानक जमिनीतून मोठा आवाज आला. घरावरील पत्रे हलू लागले आणि स्वयंपाकघरातील भांडी खाली पडली. हा थरार इथेच थांबला नाही, तर ६ मार्चच्या सकाळी १०:०५ वाजता पुन्हा एकदा जमीन हादरल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.
advertisement
जमिनीतून गूढ आवाज, भांडी वाजतात
राशा गावाजवळील डोंगराळ भागातून विचित्र आवाज येत असून त्यानंतर जमीन १ ते २ सेकंद हादरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्याही चर्चा आहेत. या सततच्या धक्क्यांमुळे लहान मुलं आणि वृद्धांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. वारंवार होणाऱ्या या धक्क्यांमुळे संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. "प्रशासनाने आता तरी जागं व्हावं आणि या भागात तातडीने 'भूकंपमापन यंत्र' बसवावं," अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
