TRENDING:

Kharat Part 2: 'होय, टॅबमध्ये तरुणीसोबत विवस्त्र...', नाशिकच्या रवींद्र एरंडेची धक्कादायक कबुली, पोलिसांना काय सांगितलं?

Last Updated:

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण राज्यभर गाजत असताना नाशिकमधील दुसरा भोंदू रवींद्र एरंडे प्रकरणात देखील नवनवीन खुलासे होत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचं प्रकरण राज्यभर गाजत असताना नाशिकमधील दुसरा भोंदू रवींद्र एरंडे प्रकरणात देखील नवनवीन खुलासे होत आहेत. हस्तरेषातज्ज्ञ असल्याचे भासवून भोंदूगिरी करणाऱ्या संशयित रवींद्र एरंडे याने त्याच्या ‘टॅब’मध्ये शेकडो आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आढळले आहेत. हे सर्व आक्षेपार्ह सामग्री दुसरी तिसरी कुणाची नव्हे तर एरंडे याच्याच मैत्रिणींची असल्याचं समोर आलं आहे. आता या व्हिडीओजबाबत रवींद्र एरंडे याने धक्कादायक कबुली दिली आहे.
अशोक खरात पार्ट २
अशोक खरात पार्ट २
advertisement

‘टॅबमध्ये माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो आणि व्हिडीओ आहेत’, असं एरंडेनं पोलिसांना सांगितलं आहे. त्याने खंडणीबाबत दाखल केलेल्या फिर्यादीत देखील याचा उल्लेख केला आहे. पण एरंडेच्या जवाबामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळताना दिसत आहे. आरोपी एरंडे हा संबंधित अश्लील फोटो आणि व्हिडीओचा वापर करून महिलांचं लैंगिक शोषण करत होता का? किंवा खंडणीसाठी त्यांना ब्लॅकमेल करत होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

advertisement

नेमकं प्रकरण काय आहे?

भोंदूबाबा अशोक खरातप्रमाणेच संशयित रवींद्र एरंडे यानेही महिलांना विविध स्वरूपाचे आमिष दाखवत भोंदूगिरी केल्याचे उघड झाले आहे. एरंडेच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी जप्त केली. आक्षेपार्ह व्हिडीओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपवणाऱ्या रवींद्र एरंडेचे लैंगिक अत्याचाराचे बिंग त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले. सातपूर पोलिसांनी संशयित एरंडेला अत्याचारासह ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात अटक केली. एरंडेच्या पोलीस कोठडीत सत्र न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत वाढ केली.

advertisement

ऑफिस बॉयमुळे पर्दाफाश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Youtube वर पाहिलं अन् निर्णय घेतला, नोकरी करत सुरू केला थंडगार पेयाचा व्यवसाय, आता डबल कमाई
सर्व पहा

‘ऑफिस बॉय’ने मालकाच्या गैरकृत्यांचा भांडाफोड करून बारा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. एरंडेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीखोरांना अटक केली होती. या फिर्यादीमध्येच एरंडेने स्वतःचे गैरकृत्य एकप्रकारे मान्य केले आहे. कारण, खंडणीच्या फिर्यादीत ‘मैत्रिणीसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ असा डाटा एका टॅबमध्ये सेव्ह करून तो ऑफिसमध्येच ठेवला होता’, असा उल्लेख एरंडेने केला. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या ‘डीव्हीडी’मध्ये त्याचेच शंभर आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ सापडले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Kharat Part 2: 'होय, टॅबमध्ये तरुणीसोबत विवस्त्र...', नाशिकच्या रवींद्र एरंडेची धक्कादायक कबुली, पोलिसांना काय सांगितलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल