TRENDING:

सूर्याचा जळगाववर कहर! एका दिवसात तापमानाचा विक्रम मोडला; तज्ज्ञांनी दिला हा धोक्याचा इशारा

Last Updated:

जळगावमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानात ४.५ अंशांनी वाढ होऊन पारा ३६.५ अंशांवर पोहोचला; पुढील २४ तासांत ३८ अंश ओलांडण्याची शक्यता. नागरिकांना सतर्कतेचा सल्ला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, प्रतिनिधी विजय वाघमारे: जिल्ह्याचं हवामान नेहमीच टोकाचं असतं, पण यंदा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाने आपलं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अवघ्या एका दिवसात जळगावच्या तापमानात तब्बल ४.५ अंशांची मोठी वाढ झाली असून, पारा थेट ३६.५ अंशावर जाऊन पोहोचला आहे. ही अचानक झालेली वाढ जळगावकरांच्या घामाच्या धारा काढणारी ठरत आहे.
News18
News18
advertisement

पुढील २४ तास महत्त्वाचे!

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ही उष्णतेची लाट इथेच थांबणारी नाही. येत्या २४ तासांत तापमानाचा पारा आणखी २ ते ३ अंशांनी वाढण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच, जळगावचा पारा लवकरच ३८ अंशांचा टप्पा ओलांडू शकतो. मार्चच्या सुरुवातीलाच जर ही स्थिती असेल, तर एप्रिल आणि मे महिन्यात जळगाव 'भट्टी'सारखं तापण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

advertisement

नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

दिवसा वाढलेलं कमाल तापमान आणि रात्रीचं किमान तापमान यातील झपाट्याने होणारा बदल आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले असून, उन्हाच्या तीव्र झळा आता जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे.

तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञांनी नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कामाशिवाय दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा. बाहेर जाताना डोक्याला पांढरा रुमाल किंवा टोपी वापरा. अंग पूर्ण झाकले जाईल, असे सुती आणि सैल कपडे परिधान करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 वर्षांची परंपरा, सर्वात स्वस्त बांगड्यांची लेन,पुण्यातील हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. भरपूर पाणी, लिंबू सरबत किंवा ताकाचे सेवन करा. जळगावचा पारा ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता प्रशासनाकडूनही नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
सूर्याचा जळगाववर कहर! एका दिवसात तापमानाचा विक्रम मोडला; तज्ज्ञांनी दिला हा धोक्याचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल